बातम्या
डी वाय पाटील शुगर टेक्नॉलॉजीमध्ये करियर मार्गदर्शन मेळावा उत्साहात
By nisha patil - 4/9/2023 7:51:11 AM
Share This News:
डी वाय पाटील शुगर टेक्नॉलॉजीमध्ये करियर मार्गदर्शन मेळावा उत्साहात
जिल्ह्यातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
गगनबावडा येथील डी. वाय. पाटील शुगर टेक्नॉलॉजी कॉलेज मार्फत बारावीच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित ‘करिअर मार्गदर्शन' मेळावा रविवारी उत्साहात संपन्न झाला. बारावी (विज्ञान) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना साखर, अल्कोहोल, इथेनॉल आणि पूरक उद्योग व्यवसायामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याबात डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जयदीप पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.
यावेळी डी. वाय. पाटील साळोखेनगर कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून गगनबावड्या सारख्या ठिकाणी साखर उद्योगाशी संलग्नित शिक्षण संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. साखर, अल्कोहोल, इथेनॉल आणि पूरक उद्योग या क्षेत्रामध्ये सरकारी व खाजगी नोकरी करायची असेल तर बी.एस.सी. इन शुगर टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त आहे. या क्षेत्रातील करिअरच्या अमाप संधी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त व शिवाजी विद्यापीठ संलग्नित डी.वाय.पाटील शुगर टेक्नॉलॉजी कॉलेज गगनबावडा येथे सुरू केले आहे.
बीएससी इन शुगर टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचा कालावधी,नोकरी मिळवण्याचे पर्याय, प्रवेश प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती याबद्दलची माहिती कॉलेजचे प्रभारी प्राचार्य निवास पाटील यांनी मेळाव्यामध्ये दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयोग पाटील यांनी केले तर आभार शहाजी सुतार यांनी मानले.
या मेळाव्यासाठी डी. वाय पाटील प्रतिष्ठानचे सचिव श्रीपाद धरणगुत्ती, डी वाय पाटील मेडिकल कॉलेजचे डेप्युटी रजिस्ट्रार एस पी जाधव, डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, विनोद पंडित यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गगनबावडा: डी.वाय.पाटील शुगर टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना संथेचे सचिव श्रीपाद धरणगुत्ती, डॉ. अभिजीत माने, निवास पाटील आदी.
डी वाय पाटील शुगर टेक्नॉलॉजीमध्ये करियर मार्गदर्शन मेळावा उत्साहात
|