बातम्या
डी वाय पाटील शुगर टेक्नॉलॉजी मध्ये रविवारी करियर मार्गदर्शन मेळावा
By nisha patil - 1/9/2023 11:05:02 PM
Share This News:
- 3 सप्टेंबरला जिल्ह्यातून शेकडो विध्यार्थी होणार सहभागी
गगनबावडा येथील डी वाय पाटील शुगर टेक्नॉलॉजी कॉलेज मार्फत बारावीच्या विध्यार्थ्यांसाठी रविवार (3 सप्टेंबर) रोजी ‘करिअर मार्गदर्शन' मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना साखर, अल्कोहोल, इथेनॉल आणि पूरक उद्योग व्यवसायामध्ये असलेल्या करियर संधीबाबतची माहिती मिळणार असल्याचे डी वाय पाटील साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री जयदीप पाटील यांनी सांगितले.
यावेळी डी वाय पाटील साळोखेनगर कॅम्पसचे संचालक डॉ.अभिजीत माने म्हणाले, संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील व उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून गगनबावड्या सारख्या ठिकाणी साखर उद्योगाशी संलग्नित शिक्षण क्षेत्रामध्ये संधी निर्माण होणे गरजेचे आहे. साखर, अल्कोहोल,इथेनॉल आणि पूरक उद्योग या क्षेत्रामध्ये सरकारी व खाजगी नोकरी करायची असेल तर बी.एस.सी. इन शुगर टेक्नॉलॉजी हा महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त व शिवाजी विद्यापीठ संलग्नित अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त आहे. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून डी वाय पाटील ग्रुपने गगनबावडा सारख्या ठिकाणी शासन मान्यता प्राप्त डी.वाय.पाटील शुगर टेक्नॉलॉजी कॉलेज सुरू केले आहे.
बीएससी इन शुगर टेक्नॉलॉजी या विषयाचा कालावधी,नोकरी मिळवण्याचे पर्याय, कोर्ससाठीचा प्रवेश प्रक्रिया,त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र व शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती याबद्दलची सर्व माहिती या मेळाव्यामध्ये देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन डॉ माने यांनी केले.
डी वाय पाटील शुगर टेक्नॉलॉजी मध्ये रविवारी करियर मार्गदर्शन मेळावा
|