बातम्या
डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स कॅम्पस इंटरव्यू
By nisha patil - 1/29/2025 9:44:06 PM
Share This News:
डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स कॅम्पस इंटरव्यू
कसबा बावडा: डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील १५ पॉलिटेक्निकच्या २४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. टाटा मोटर्सचे सीनियर मॅनेजर संजय भोळे आणि अन्य अधिकार्यांनी इंटरव्यू घेतले.
डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्यूच्या माध्यमातून जॉबच्या संधी मिळाल्याबद्दल प्रोत्साहन दिले. संजय भोळे यांनी टाटा मोटर्सला 'फॅमिली' मानून प्रॅक्टिकल ज्ञान आणि अनुभवाचे महत्त्व सांगितले.
डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स कॅम्पस इंटरव्यू
|