बातम्या

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

DYPatil in Engineering Two day workshop concluded


By nisha patil - 6/9/2023 5:49:27 PM
Share This News:



डी. वाय.  पाटील अभियांत्रिकीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागातर्फे दोन दिवसीय ‘पॅरल प्रोग्रामिंग ऑन सीपीयू अँड जीपीयु युजिंग ओपन एमपी’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. इंटेल सर्टिफाइड ट्रेनर मंदार गुरव यांनी पॅरलल प्रोग्रामिंग कसे करावे याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
   

राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन या भारत सरकारच्या योजनेअंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली. यासाठी तज्ञ् मार्गदर्शक म्हणून लाभलेले गुरव हे आयटी बॉम्बे येथून डॉक्टरेट पदवी मिळालेले आहेत. या कार्यशाळेत तिसऱ्या व अंतिम वर्षाच्या १४० विध्यार्थ्यानी भाग घेतला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी फायदा होणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागा प्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी केले.  
 

यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज  पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे मार्गदर्शन मिळाले . 

कोल्हापूर : कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मंदार गुरव.


डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न