बातम्या
सौर कृषी वाहिनी योजनेतुन अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा
By Administrator - 1/15/2025 2:51:28 PM
Share This News:
सौर कृषी वाहिनी योजनेतुन अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा
सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
कोल्हापूर प्रतिनिधी : सौर कृषी वाहिनी योजनेतुन 2.0 मधून अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होतोय. या महिना अखेर आणखी तीन प्रकल्प कार्यान्वित होणार असून त्यातून एकूण सहा हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे. प्रकल्पाची पाहणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून सध्या जिल्ह्यातील अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होतोय. महिना अखेर तीन प्रकल्प कार्यान्वित होणारा असून त्यातून एकूण सहा हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे. यामुळे लवकरच कोल्हापूर जिल्हा दिवसा वीज पुरवठा करणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरनार असा विश्वास अधीक्षक अभियंता जी एम लटपटे यांनी व्यक्त केलाय. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविण्यात येत असून त्यात राज्यात सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सुरू असून पश्चिम महाराष्ट्रातील पहिला तीन मेगाव्हेट क्षमतेचा प्रकल्प हरोली येथे कार्यान्वित झाला आहे.
या प्रकल्पाची पाहणी जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी केलीय. या मध्ये जिल्ह्यातील हरोली, किनीसह 44 उपकेंद्रांमध्ये 53 ठिकाणच्या प्रकल्पाचा समावेश असून योजनेअंतर्गत जिल्ह्यात 53 ठिकाणी एकूण क्षमता 170 मेगावॅट सौर प्रकल्प प्रस्थापित आहेत. या पैकी 37 प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे.
सौर कृषी वाहिनी योजनेतुन अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा
|