शरीरातील पाणी शोषून घेतील रोजच्या आहारातील पदार्थ
By nisha patil - 7/18/2023 7:23:57 AM
Share This News:
शरीर निरोगी राखण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाणी आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. शरीरात पाणी कमी झाल्यास डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते.
उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या अधिक तीव्र होते. तर, पावसाळ्यात अनेक जणांकडून पाणी कमी प्यायलं जातं. त्यामुळं अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. हायड्रेट राहण्यासाठी फक्त पाणी पिणेच गरजेचं नाहीये तर रोजच्या आहारावरही लक्ष देणे गरजेचे आहे.
अनेकदा वेळी अवेळी किंवा चुकीचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने शरीरात पाण्याची मात्रा कमी होऊ शकते. शरीरात पाणी कमी झाल्यास सतत तहान लागणे, लघवीचा रंग गडद पिवळा असणे, लघवीला तीव्र दुर्गंध येणे, लघवीची वारंवारता घटणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे, तोंड, ओठ किंवा जीभ सतत सुकणे आणि डोळ्याची जळजळ अशी लक्षणे जाणवतात. फक्त पाणी कमी प्यायल्यामुळेच नाही तर काही खाद्यपदार्थांनाही शरीरातील पाण्याची मात्रा खालावते. जाणून घेऊया कोणते आहेत हे पदार्थ.
कॉफी
अनेक जणांच्या दिवसाची सुरुवात कॉफीने होते. कॉफीमध्ये कॅफिन असते ज्यामुळं दिवसभराची उर्जा मिळते. मात्र त्याचमुळं डिहायड्रेशनदेखील होऊ शकते. शरीरात कॅफिनची मात्रा अधिक झाल्यास ते मूत्रवर्धक म्हणून काम करते. ज्यामुळं तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवते.
ग्रीन टी
ग्रीन टी हे एक हेल्थ ड्रिंक म्हणून मानले जाते. कारण यात अँटीऑक्सिडेंट आणि फ्लेवोनोइडची मात्रा अधिक असते. मात्र यामुळंही तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते. कॉफीप्रमाणेच ग्रीन टीमध्येही काही प्रमाणात कॅफीन असते. ज्यामुळं लघवीला जाण्याचे प्रमाण वाढवते. त्यामुळं शरीरात पाण्याची कमी जाणवू शकते. परिणामी तुम्हाला थकवा आणि सुस्तावा जाणवेल.
बीट
बीटामध्ये पोटेशियमची मात्रा अधिक असते. ज्यात तुमच्या शरीरातील पदार्थ बाहेर काढून टाकण्याची क्षमता असते. त्यामुळं जर तुम्ही अतिप्रमाणात बीट खात असाल तर त्यामुळं तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
प्रोटीन
वजन कमी करण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी हाय प्रोटिन पदार्थांचा आहारात समावेश करण्यात येतो. प्रोटिनचे शरीराला अनेक फायदे आहेत मात्र डिहायड्रेशनची एक कारणही प्रोटिनहेच आहे. प्रोटिन शरीरात नायट्रोजन निर्माण करते. त्यामुळं ते चयापचय प्रक्रियेसाठी अतिरिक्त पाणी वापरतात. यामुळे अनेकदा शरीरात द्रवपदार्थाचे असंतुलन होते.
सोडा
सोडा आणि बाटलीबंद ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते ज्याचा शरीरावर हायपरनेट्रेमिया प्रभाव असतो. याचा अर्थ, साखर पेशी आणि ऊतींमधून पाणी बाहेर काढते, ज्यामुळे शरीरातील द्रव पातळी कमी होते.
शरीरातील पाणी शोषून घेतील रोजच्या आहारातील पदार्थ
|