बातम्या

तरुणांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्धव्यवसाय हा दिशादर्शक -अरुण डोंगळे

Dairy is a guide for the economic upliftment of youth  Arun Dongle


By nisha patil - 9/24/2024 7:53:01 PM
Share This News:



कोल्हापूर  ता.२४: दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचवण्यास मदत झाली असून जातिवंत जनावरांची जोपासना आणि शुद्ध प्रतीचे दुध यामुळे ग्रामीण भागात गोकुळच्या माध्यमातून  दुग्ध व्यवसाय चांगलाच विस्तारलेला आहे. गोकुळमुळे  एक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याकडे ग्रामीण भागातील तरुणांचा कल वाढण्यास मदत झाली आहे .तसेच गोकुळ दूध संघाचे पाठबळ, अनुदान योजना , सेवा सुविधा यामुळे अनेकांनी दुग्ध व्यवसायात प्रवेश केला असून अनेक तरुणांच्या  आर्थिक उन्नतीसाठी दुग्धव्यवसाय हा दिशादर्शक ठरू शकतो असे मत गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे  यांनी केले ते शिरोळ तालुक्‍यातील हेरवाड या गावातील संतूबाई सहकारी दूध संस्‍थेच्‍या वतीने अयोजीत करण्यात आलेल्या परराज्यातून जातिवंत  म्‍हैशी खरेदी केलेल्या दुध उत्पादकांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते .

डोंगळे म्हणाले,कि  गोकुळच्या  म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत संतूबाई दूध संस्थेच्या दूध उत्पादकांनी हरियाणा राज्यातून मुऱ्हा जातीच्या ५८ म्हैशी खरेदी केल्‍या हि निश्चितच अभिमानाची गोष्‍ट असून  गोकुळच्‍या विविध योजनाचा  जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी लाभ घेउन म्‍हैस दूध संकलन वाढीसाठी प्रयत्‍न करावेत असे अवाहन श्री डोंगळे यांनी  केले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे यांच्या हस्ते .संतूबाई सहकारी दूध संस्‍थेचे दूध उत्‍पादक  किसन माळी,बजरंग बरगाले, शकील जमादार, दिलीप माळी,दिनकर माळी,विजय पाटील, अरविंद पाटील. यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी  उपस्थित दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब माळी व संस्थेचे पदाधिकारी तसेच गोकुळचे दूध संकलन अधिकारी अशोक पाटील सुहास डोंगळे राहुल राजमाने अनिल पाटील आदी उपस्थित होते
 


तरुणांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्धव्यवसाय हा दिशादर्शक -अरुण डोंगळे