बातम्या
दाजीपुर अभयारण्य 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी राहणार बंद.
By nisha patil - 12/25/2024 4:03:43 PM
Share This News:
दाजीपुर अभयारण्य 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी राहणार बंद.
राधानगरी येथील दाजीपूर अभयारण्य १ जानेवारी व ३१ डिसेंबर या कालावधीत २ दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याचे परिपत्रक विभागीय वन अधिकारी कोल्हापूर श्रीकांत पवार यांनी काढलय.
राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य हे गवारेडा पट्टेरी वाघ व इतर प्राणी अशा दुर्मिळ प्राण्यांसाठी प्रसिद्ध असून इथे महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
दरम्यान नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून वनविभागाने 31 डिसेंबर व एक जानेवारी या दोन दिवसांसाठी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या दिवशी विनापरवाना अभयारण्या प्रवेश केल्यास वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आलंय
दाजीपुर अभयारण्य 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी राहणार बंद.
|