बातम्या
शिरोली पोलीस ठाण्यावर दलित महासंघाचा मोर्चा
By nisha patil - 6/30/2023 5:39:40 PM
Share This News:
तारा न्युज वेब टीम : हेरले इथल्या अक्षय लोखंडे या युवकाचा 5 जानेवारी 2023 रोजी शिरोली सांगली फाटा इथं संशयास्पद अपघातात मृत्यू झाला होता. त्याला चार चाकी गाडीने फरपटत नेले होते.सदर चार चाकी गाडी आणि ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या घटनेला सहा महिने झाले तरी संशियतांना अटक केली नसल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.
हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या अक्षय लोखंडे या युवकाचा 5 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी शिरोली सांगली फाटा रस्त्यावर संशयास्पद अपघाती मृत्यू झाला होता. एका चार चाकी गाडीने त्याला फरपटत नेले होते. अक्षय याने गाडीचा दरवाजा पकडलेला होता आणि गाडीतून ही त्याचा हात पकडून फरफटत नेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. यातील संशयित ही स्पष्ट दिसत होते. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पण गेली सहा महिने शिरोली एमआयडीसी पोलिसांनी संशयतांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली नाही. लोखंडे कुटुंबाने अनेक वेळा पोलीस अधिकाऱ्यांना भेटून न्याय मागितला होता. पण आज तागायत कोणतीच कारवाई न झाल्याने दलित महासंघाचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब दबडे यांच्या नेतृत्वाखाली आज शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा पोलीस ठाण्यावर आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या दारात मयत अक्षय लोखंडे याच्या प्रतिमेचे पूजन करून न्याय मिळावा म्हणून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. आणि पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारावे अशी मागणी लावून धरली. यावेळी अक्षय लोखंडे यांच्या आईने न्याय मिळावा यासाठी घातलेले गाऱ्हाने हृदय पिळवटून टाकणारे होते. वारंवार अक्षयच्या फोटोवरून हात फिरवत मातेचा अश्रूचा बांधफुटत होता. यावेळी बोलताना अक्षय ची आई हेमा लोखंडे यांनी खाकी वर्दीला मी नेहमी सलाम करत असते पण माझ्या मुलावर झालेला अन्याय ही खाकी वर्दी आठ दिवसात न्याय देऊ शकत नसेल तर मी पोलीस ठाण्याच्या आवारात आत्मदहन करीन असा इशारा दिला. तर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे यांनी आठ दिवसात न्याय न मिळाल्यास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग हे मुदत रोखण्याचा इशारा दिला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक घर पाटील यांनी लवकरात लवकर संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले. या मोर्चामध्ये आप्पासाहेब कांबळे, विजय समुद्रे, विजय दबडे, सुकुमार लोखंडे, आनंदात तिवडे, सुकुमार कांबळे, नंदू तिवडे, शीला दीपक, दिपाली अवघडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.
शिरोली पोलीस ठाण्यावर दलित महासंघाचा मोर्चा
|