बातम्या

दानोळी,माणगाववाडी गावठी दारु हातभट्टीवर छापा;

Danoli Mangaonwadi village raid on liquor hand furnace


By nisha patil - 7/4/2024 10:30:15 PM
Share This News:



महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्हात अवैद्य व्यवसायाची माहिती काढून  वरीष्ठांनी दिले आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण चे रविंद्र कळमकर यांनी पोलीस अधिकारी व अमंलदार माहिती मिळाली की, माळभाग, माणगांववाडी, ता. हातकणंगले, व दानोळी, ता. शिरोळ,  येथे पहाटेचे  मिळाले माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दोन पथके नेमली  शेष मोरे यांचे पथकाने आज माळभाग, माणगांववाडी, ता. हातकणंगले या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारु तयार करणारे भट्ट्यावर एकूण 05 ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या. सदर परिसरात 05 ठिकाणी हातभट्टीची दारु तयार करणेकरीता वापरत  दारु व इतर साहित्य असा एकूण 57,000/- किंमतीचा माल जप्त करण्यात आला.याबाबत सागर सुरेश खोत, संदीप चंद्रकांत खोत,  कुमार विलास खोत तिघे रा. माणगांववाडी, ता. हातकणंगले निरंजन आण्णासो भोसले, रा. चंदूर, ता. हातकणंगले,  व 05)रोहित प्रभाकर माळी, रा.खोतवाडी, ता.हातकणंगेल, यांचे विरुद्ध हातकणंगले पोलीस ठाणेत
गुन्हा दाखल केला आहे.

तसेच फौजदार राजीव शिंदे यांचे पथकाने आज चव्हाण ओढा, दानोळी, ता.शिरोळ या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारु तयार करणारे साहित्य नष्ट केले.

हातभट्टीचे साहित्य  35,400 /- रुपये किं.नष्ट करण्यात आला. यावेळी अर्जुन भिमराव चव्हाण व  सचिन दगडू मंडले दोघे रा.बेघर वसाहत, दानोळी, ता. शिरोळ,  यांचे विरुध्द जयसिंगपूर पोलीस ठाणे,
येथे गुन्हा दाखल केला आहे.दोन्ही कारवाईमध्ये   92,400 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एकूण 07 आरोपींविरूध्द कारवाई केली.सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित ,  निकेश खाटमोडे पाटील  यांचे मार्गदर्शनाप्रमाणे   रविंद्र कळमकर,  शेष मोरे तसेच पोलीस अमंलदार चंदू नन्नवरे, राजीव शिंदे, शिवाजी जामदार, यशवंत कुंभार, रफिक आवळकर, संजय कुंभार, संतोष पाटील,
युवराज पाटील, सतिश जंगम, दिपक घोरपडे, संजय इंगवले, नवनाथ कदम, महेश खोत, प्रविण
पाटील, सोमराज पाटील व अमर शिरढोणे यांनी केली आहे.


दानोळी,माणगाववाडी गावठी दारु हातभट्टीवर छापा;