बातम्या

श्री अंबाबाईचे दर्शन आता आणखी सोईस्कर होणार

Darshan of Shri Ambabai will be more convenient now


By nisha patil -
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या सोयीस्कर दर्शनासाठी मंदिर परिसरात एल इडी टीव्हीच्या  थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे . मंदिर परिसरात एलईडी यंत्रणेचे पूजन करून भाविकांसाठी कार्यान्वित करण्यात आले. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून आणि माजी खासदार संभाजी राजे यांच्या प्रयत्नातून प्रायोगिक तत्त्वावर 55 इंची एलईडी टीव्ही बसवण्यात आली आहे.भाविकांना थेट दर्शनासोबतच सुरक्षा यंत्रणेसाठी याचा उपयोग देखील होणार आहे. यावेळी देवस्थान समितीचे महादेव दिंडे राहुल जगताप अभी पाटील उपस्थित होते.


श्री अंबाबाईचे दर्शन आता आणखी सोईस्कर होणार