बातम्या
वारी मार्गावर समाजसेवेचे दर्शन
By nisha patil - 6/30/2023 5:42:08 PM
Share This News:
तारा न्युज वेब टीम : गुरुवारी सर्वत्र आषाढी एकादशीचा आणि दिंड्यांचा उत्साह पाहायला मिळाला. कोल्हापुरातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नंदवाकडे कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातून वारकऱ्यांची दिंडी भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. या वारीच्या मार्गावर अनेक सामाजिक संस्था व्यक्तिगत स्वरूपामध्ये वारकऱ्यांना फळांचे वाटप ,दूध, पाणी वाटप अशा माध्यमातून दिंडीची सेवा केली गेली. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्ती हे सामाजिक उपक्रम राबवतात. जाणून घेऊया कशाप्रकारे ते या दिंडी मार्गावर सेवा करतात
वारी मार्गावर समाजसेवेचे दर्शन
|