बातम्या
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून "डे विथ कलेक्टर" उपक्रम
By nisha patil - 1/20/2025 10:07:02 PM
Share This News:
प्रसाद जाधवने "डे विथ कलेक्टर" उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी सोबत प्रशासकीय कामकाजाचे धडे गिरवले
हातकणंगले, दि. 20: पारगाव येथील श्री पाराशर हायस्कूलच्या दहावीतील विद्यार्थी प्रसाद संजय जाधव यांनी आज "डे विथ कलेक्टर" उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संवाद साधत प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. प्रसादच्या जिज्ञासू वृत्तीचे आणि या उपक्रमाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कौतुक केले.
प्रसादचा उंचीवरील उपचारासाठी परदेशात पाठविण्याबाबत मंत्री मुश्रीफ यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध बैठकांमध्ये उपस्थित राहून प्रसादने प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली.
या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. "कॉफी विथ कलेक्टर" हा उपक्रम शिक्षकांसाठी देखील लवकरच राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून "डे विथ कलेक्टर" उपक्रम
|