बातम्या

पुण्यातील जंगली महाराज रोडवर भरदिवसा गोळीबार

Daylight firing on Jungli Maharaj Road in Pune


By nisha patil - 4/17/2024 6:54:17 PM
Share This News:



 पुण्यात बांधकाम व्यवसायिकावर फायरिंग करण्याचा  प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली. काल  सायंकाळची घटना जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या वन प्लस शोरूम समोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 
 

धीरज दिनेशचंद्र आरगडे बांधकाम व्यवसायिकावर स्विगीचे वस्त्र परिधान करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. हल्लेखोर स्विगीसारखे वस्त्र परिधान करून हेल्मेट घातले होते. त्या दोघांनी पिस्टल काढून दोन वेळा फार करण्याचा प्रयत्न केला मात्र फायर न झाल्याने दोन आरोपींनी पुढे पळ काढला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून शिवाजीनगर पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

यासोबतच हडपसर परिसर देखील गोळीबाराने हादरल . दोन सैनिकांमध्ये वाद झाल्याने भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला. हडपसर परिसरातील शेवाळवाडी या परिसरात हा प्रकार घडला आहे. हा प्रकार घडल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावारण निर्माण झालं होतं. यात एक सैनिक जखमी झालं असून या सैनिकावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी आरोपी असलेल्या सैनिकाला ताब्यात घेतलं आहे. जयवंत खलाटे असे जखमी झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. याप्रकरणी सुधीर रामचंद्र शेडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
 

पुणे जिल्ह्यात गोळीबार करणं आता नेहमीचं झालं असल्याचे मागील काही दिवसांच्या घटनांवरून समोर येत आहे. शिक्षणाचं माहेर घर म्हणून असलेलं पुणे आता गोळीबारांच्या घटनांवरून चर्चेत येत आहे. मागील मागील आठवड्यातच पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ रात्रीच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे हॉटेलमध्ये घुसून जेवणाला बसलेल्या या तरुणाची हत्या करण्यात आली. यापूर्वी देखील सतत पुण्यात अशा गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. आता तर क्षृल्लक वादातून गोळीबार केला जात असल्याचे समोर आले आहे. 
,


पुण्यातील जंगली महाराज रोडवर भरदिवसा गोळीबार