बातम्या
एमबीएसाठी ३१ जानेवारी तर एमसीएसाठी १ फेब्रुवारी पर्यंत अंतिम मुदत . .
By nisha patil - 1/24/2024 7:46:58 PM
Share This News:
एमबीए आणि एमसीएच्या प्रवेशासाठी डीटीईची प्रवेश परीक्षा द्यावी लागते. एमबीए प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी ही असून, एमसीए प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत एक फेब्रुवारी आहे, तरी एमबीए, एमसीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी www.mahacet.org या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावेत, अशी माहिती केआयटीज आयएमईआरचे संचालक डॉ. सुजय खाडिलकर आणि प्रवेशप्रमुख डॉ. प्रवीण जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावर्षीची एमबीए प्रवेश परीक्षा ९ आणि १० मार्च रोजी होणार असून या परीक्षेसाठीचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी ही आहे, तर एमसीएची प्रवेश परीक्षा १४ मार्च रोजी होणार असून, या परीक्षेसाठीचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत एक फेब्रुवारी आहे, तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रवेश परीक्षेचे अर्ज वरील वेबसाईटवर भरावेत. कारण या प्रवेश परीक्षा दिल्या तरच शासनाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या सवलतींसाठी विद्यार्थी पात्र ठरतात.
एमबीएसाठी ३१ जानेवारी तर एमसीएसाठी १ फेब्रुवारी पर्यंत अंतिम मुदत . .
|