बातम्या

पन्हाळा तहसीलवर मराठा आरक्षण साठी आमरण उपोषण

Death fast for Maratha reservation in Panhala Tehsil


By nisha patil - 10/17/2023 7:18:46 PM
Share This News:



 कोल्हापूर जिल्ह्यातील  पन्हाळा तहसील कार्यालय समोर  वसंत रंगराव पाटील व सुरेश  जगदाळे  राहणार जाफळे, तालुका, पन्हाळा हे गेले तीन दिवस  प्रमुख चार मागण्या  घेऊन आमरण उपोषण साठी बसले आहेत. त्यांनी मराठ्यांना  आरक्षण लवकर मिळण्यासाठी ,मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी हे आमरन उपोषण सुरू केले आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील  पन्हाळा तहसील कार्यालय समोर  वसंत रंगराव पाटील व सुरेश  जगदाळे  राहणार जाफळे, तालुका, पन्हाळा हे गेले तीन दिवस  प्रमुख चार मागण्या  घेऊन आमरण उपोषण साठी बसले आहेत  
त्यांची पहिली मागणी मराठ्यांना लवकर आरक्षण मिळावे , त्यांची दुसरी मागणी आहे कि मराठ्यांना  24 टक्के आरक्षण द्यावे ते आरक्षण आर्थिक निकषावर नुसार  द्यावे. तिसरी मागणी  , मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे. चौथी जाती निहाल जनगणना करून त्या त्या जातीच्या लोकसंख्ये नुसार आरक्षण द्यावे,  या प्रमुख चार मागण्या घेऊन त्यांनी हे उपोषण सुरु केले आहे ,जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. तो पर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवू अशी माहिती आमचे तारा न्यूजचे  पन्हाळा प्रतिनिधी शहाबाज मुजावर, याना दिली 

           या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पन्हाळा शाहूवाडी चे माजी आमदार सत्यजित पाटील (सरूडकर), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पन्हाळा प्रमुख. मारुती माने, शहर प्रमुख, जुनेद मुजावर, शोएब काजी, पन्हाळ्याची माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी  भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह  भोसले, प्रमोद उदाळे, धनंजय बच्चे, गोपाळ साठे, बबन जामदार,  पन्हाळा गाईड सेवा संघाच्या वतीने अरुण भणगे यांनी या उपोषणास  पाठिंबा दर्शवला


पन्हाळा तहसीलवर मराठा आरक्षण साठी आमरण उपोषण