बातम्या
शिरगाव च्या पाखर्या बैलाचा उष्माघाताने मृत्यू
By nisha patil - 5/13/2024 6:49:05 PM
Share This News:
पांडुरंग फिरींगे राधानगरी : प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे शिरगाव ता.राधानगरी येथील मेजर विश्वजीत फिरींगे - सरकार यांच्या शैर्यती चा पाखर्या बैलचा उष्माघाताने मुर्त्यु झाल्याने दिड लाखांचे नुकसान झाले. बैलांच्या शैर्यती चा नाद असल्याने शैर्यती चे बैल पाळण्यात आले.कोल्हापूर-गारगोटी राज्यमार्गावर माजगाव (ता. राधानगरी) पाटीजवळ रविवारी सायंकाळी उष्माघाताने बैलाचा जागीच मृत्यू झाला. यात मेजर विश्वजित फिरींगे या शेतकऱ्याचे अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले.
राधानगरी तालुक्यातील शिरगाव येथील मेजर हे सैन्यात भरती झाले आहेत. ते अजुनही जम्मू काश्मीर मधील राजूरी जिल्ह्यात सेवा बजावत आहेत. त्यांना बैल सांभाळायची आवड असल्याने त्यांनी दोन खिलारी बैलजोडी खरेदी केली. या बैलांचा चांगला सांभाळ आपण गावी नसल्याने होणार नाही. म्हणून त्यांनी बैलजोडी ठिकपुर्ली येथील जालिंदर पाटील यांच्याकडे दोन
वर्षांपासून सांभाळण्यासाठी दिली आहे. पाटील बैलजोडी फिरविण्यासाठी
चंद्रे येथील बस स्टॉपवर आले होते. घरी जात असताना माजगाव पाटीजवळ एक बैल उष्माघाताने जागीच मृत्युमुखी पडला.देशसेवा बजावत असणाऱ्या विश्वजीत फिरींगे यांच्या शैर्यती च्या बैलांचा झालेला अपघाती मृत्यू निश्चितच मनाला चटका लावणारी घटना घडली. या घडलेल्या घटनेमुळे शिरगाव परिसरात शेतकऱ्यांना दुख व्यक्त केले.मुलांना सांभाळतात तसे मेजर बैलांची काळजी घेत होते.या बैलाने जिल्ह्यात ठिकठिकाणी शैर्यती जिंकून दिलेल्या होत्या. बैलांच्या मुर्त्यु ची बातमी समजताच मेजरांना गहिवरून आले.
शिरगाव च्या पाखर्या बैलाचा उष्माघाताने मृत्यू
|