अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी

Death threat to Abu Azmi


By nisha patil - 6/27/2023 1:25:33 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना एका फोनवरून आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
याप्रकरणी अबू आझमी यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधी माहिती देताना अबू आझमी म्हणाले की, या गृहस्थाने मला माझ्या वैयक्तिक फोन नंबरवर कॉल करून आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ३ दिवसांत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या प्रकरणाची तक्रार कुलाबा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अबू आझमी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आणि मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
याआधी जानेवारी महिन्यामध्येही अबू आझमी यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख अबू असीम आझमी यांना औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यांच्या पर्सनल असिस्टंटचा फोन आला होता.


अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी