बातम्या
आठवड्यातून दोन दिवस रॅपिअर व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय
By nisha patil - 6/28/2023 7:07:00 PM
Share This News:
इचलकरंजी परिसरात चाललेली सुती व्यवसायातील आर्थिक मंदी, सुती कापडाचे पडलेले दर यामुळे पाँवरलुम असोसिएशनने आठवड्यातून दोन दिवस रॅपिअर व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे सदर रँपिअर व्यवसाय बंद ठेवल्यामुळे आठवड्याला सहा लाख मीटर कापड निर्मिती थांबणार असून ,इचलकरंजी सह परिसराचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. यामुळे मजुरांचा पगार व उत्पादनात ही मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचे चित्र दिसत आहे, प्रोसिजिंग ठीक झाल्यानंतर निर्णयात बदल केला जाईल असेही पावरलूम असोसिएशनचे वतीने सांगण्यात आले आहे.विनोद शिगे कुंभोज
आठवड्यातून दोन दिवस रॅपिअर व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय
|