बातम्या

श्री अंबाबाई मंदिरात दीप अमावस्या साजरी

Deep Amavasya celebration at Shree Ambabai Temple


By nisha patil - 7/17/2023 6:26:38 PM
Share This News:



आषाढी अमावस्या अर्थात दीप अमावस्या सोमवारी विविध धार्मिक पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली दीप अमावस्येच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई आकर्षक पूजा साकारण्यात आलीय. मंदिरातील समई दिवे स्वच्छ करून गाभाऱ्यासह मंदिरात प्रज्वलित करण्यात आले होते. त्यामुळे दिव्यांच्या लख्ख प्रकाशात आई अंबाबाईचा गाभारा आणि परिसर उजळून निघाला होता. दीप अमावस्या नंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते . आज अधिक आणि श्रावण मासारंभ कृत्यारंभ निमित्त पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने देवस्थानचे वैदिक पुरोहित सुदाम सांगळे प्रमोद उपाध्ये पंकज दादरने ओमकार भोरे यांनी मंत्र स्वरात दर्शदीप अमावस्या दीपपूजा आणि दीप प्रज्वलन विधी पार पाडला यावेळी व्यवस्थापक धर्मशास्त्र मार्गदर्शक उपस्थित होते.


श्री अंबाबाई मंदिरात दीप अमावस्या साजरी