विशेष बातम्या
दीपिका कक्करचा अभिनय क्षेत्राला रामराम?
By nisha patil - 5/30/2023 4:30:16 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम लवकरच आई-बाबा होणार आहेत. बाळाच्या स्वागतासाठी आता दोघेही सज्ज आहेत. आई झाल्यानंतर दीपिका अभिनय क्षेत्राला रामराम करणार असल्याची चर्चा आहे. आता या चर्चांवर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.
दीपिका म्हणाली,"मी अभिनय क्षेत्राला रामराम करणार नाही. पण बाळाच्या जन्मानंतर काही वर्ष मात्र मी छोट्या पडद्यापासून ब्रेक घेणार आहे. पूर्णपणे आईपण अनुभवण्याची माझी इच्छा आहे. सततच्या मालिकांमुळे कुटुंबियांसोबत वेळ घातवता येत नव्हता. त्यामुळे आता कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची माझी इच्छा आहे. पण याचा अर्थ मी अभिनय क्षेत्र सोडलं असा होत नाही".
दीपिका पुढे म्हणाली,"बाळाच्या जन्मानंतर जर मला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसाठी विचारणा झाली तर मी नक्कीच विचार करेल. पण काम करायचं की नाही करायचं हा निर्णय मी बाळाच्या जन्मानंतरच घेईल. मला वाटतं आईने तिच्या बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला हवा".
दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम 2018 साली लग्नबंधनात अडकले. 'ससुराल सिमर का' या मालिकेच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली. दीपिका आणि शोएब यांच्यात खूप चांगली मैत्री होती. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता गेल्या काही दिवसांपूर्वी दीपिका आणि शोएबने एक खास पोस्ट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. त्यांनी लिहिलं होतं,"कृतज्ञता, आनंद, उत्साह अशा वेगवेगळ्या भावनांनी ही बातमी तुमच्यासोबत शेअर करत आहोत. लवकरच आम्ही आई-बाबा होणार आहोत. आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे".
दीपिका कक्करचा अभिनय क्षेत्राला रामराम?
|