बातम्या

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लग्नाच्या सहा वर्षांनी होणार आई-बाबा

Deepika Padukone and Ranveer Singh will be parents after six years of marriage


By nisha patil - 4/3/2024 2:33:28 PM
Share This News:



दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लग्नाच्या सहा वर्षांनी होणार आई-बाबा 

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी  आणि राधिका मर्चेंट यांचं प्री-वेडिंग गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडत आहे.अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला प्रेग्नंट असलेल्या दीपिका पादुकोणने  धमाकेदार डान्स केला आहे.दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लग्नाच्या सहा वर्षांनी आई-बाबा होणार आहेत.BAFTA पुरस्कार सोहळ्यानंतर दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना सुरुवात झाली होती त्यानंतर जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 'मॉम टू बी' दीपिका पादुकोण सध्या आपला पती रणवीर सिंहसोबत राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये आहे.पहिल्या दिवशी अभिनेत्री रिहानाची कॉन्सर्ट एन्जॉय करताना दिसून आली. दुसऱ्या दिवशी दीपिकाने रणवीर सिंहसोबत 'दिल धडकने दो' या सिनेमातील 'गल्लां गूडिया' गाण्यावर धमाकेदार डान्स केला. 
 

पहिल्या दिवशी अभिनेत्री रिहानाची कॉन्सर्ट एन्जॉय करताना दिसून आली. अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये दीपिका-रणवीरच्या रॉयल लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.प्रेग्नंट दीपिकाने आपल्या नृत्याने उपस्थित असलेल्या मंडळींची मने जिंकली. सोशल मीडियावर दीपिका-रणवीरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे दीपिकाने सोनेरी रंगाचा लेहेंगा परिान केला होता. तर रणवीरने काळ्या रंगाचा खास आऊटफिट परिधान केला होता.


दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लग्नाच्या सहा वर्षांनी होणार आई-बाबा