बातम्या

चविष्ट मेथी पराठा, रेसिपी जाणून घ्या

Delicious Methi Paratha


By nisha patil - 2/21/2024 7:39:58 AM
Share This News:



हिवाळ्याच्या दिवसात मेथिची चव चांगली लागते. मेथीच्या सेवनाने पाचन क्रिया सुरळीत राहते. मेथीचे पराठे लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. व लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना लंच मध्ये देऊ शकतात. तर जाणून घेऊ या मेथी पराठा चांगला आणि सोप्या पद्धतीने बनवण्याची रेसिपी

साहित्य 
2 कप गव्हाचे पीठ 
1 मेथी जुडी  
1/4 कप दही
1/2 छोटा चमचा लाल मिर्ची पूड 
1/4 छोटा चमचा जीरेपूड 
1/2 छोटा चमचा ओवा 
1/2 छोटा चमचा हळद 
1 छोटा चमचा आल्याची पेस्ट
तेल गरजेप्रमाणे 
मीठ चवीनुसार 
 
कृती
मेथीचा पराठा बनवण्याआधी मेथी स्वच्छ धुवून घ्या. आता मोठया परातीत गव्हाचे पीठ घेऊन त्यात दही, ओवा सोबत सर्व वस्तु घाला . मग चवीनुसार मीठ घाला. आता या पिठाला मळून घ्या व काही वेळ तसेच ठेवा. आता पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून पराठा लाटून घ्या. व गॅसवर तवा ठेऊन त्यावर तेल टाकून दोन्ही बाजूंनी शेकून घ्या.  मग हे थोडेसे कुरकुरित झाल्यावर एक प्लेट मध्ये काढून लोणचे आणि दह्या सोबत सर्व्ह करा.


चविष्ट मेथी पराठा, रेसिपी जाणून घ्या