बातम्या
संत रोहिदास जयंती न साजरी केल्याने अन्न व औषध प्रशासनावर कारवाईची मागणी
By nisha patil - 12/2/2025 10:52:02 PM
Share This News:
संत रोहिदास जयंती न साजरी केल्याने अन्न व औषध प्रशासनावर कारवाईची मागणी
कोल्हापूर: अन्न व औषध प्रशासन कार्यालयात संत रोहिदास महाराज जयंती साजरी न केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
संविधान सन्मान प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात फेरफटका मारून पाहणी केली असता जयंतीसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचे आढळले. आयुक्त उदय लोहकरे यांना निवेदन देऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
दोन दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने संत रोहिदास महाराज जयंती साजरी केली.
संत रोहिदास जयंती न साजरी केल्याने अन्न व औषध प्रशासनावर कारवाईची मागणी
|