बातम्या
टाऊन हॉल येथे एसटी प्रवाशांना निवारा शेडची मागणी...
By nisha patil - 12/18/2024 10:43:16 PM
Share This News:
टाऊन हॉल येथे एसटी प्रवाशांना निवारा शेडची मागणी...
दररोज थांब्यावर शेकडो प्रवासी...
टाऊन हॉल येथील एसटी बस थांब्यावरील प्रवाशांना सध्या निवारा शेडअभावी उघड्यावर ताटकळत थांबावे लागत आहे. कोरोनाच्या काळात महापालिकेने येथे असलेले निवारा शेड हटवले, मात्र त्यानंतर अद्याप ते पुन्हा उभारण्यात आलेले नाही.
दररोज या थांब्यावर शेकडो प्रवासी – विद्यार्थी, महिला, आणि वृद्ध – उन्हा-पावसात एसटीची वाट पाहत थांबतात. समाजमन बहुउद्देशीय संस्थेने महापालिकेला एसटी विभागाशी समन्वय साधून त्वरित निवारा शेड उभारण्याची मागणी केली आहे.
"प्रवाशांच्या सोयीसाठी महापालिकेने तातडीने निवारा शेड उभारावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येईल," असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश गावडे यांनी सांगितले.
टाऊन हॉल येथे एसटी प्रवाशांना निवारा शेडची मागणी...
|