बातम्या
नाशिकमध्ये वाढत्या नशाखोरीवर कठोर कारवाईची मागणी
By nisha patil - 12/2/2025 6:19:04 PM
Share This News:
नाशिकमध्ये वाढत्या नशाखोरीवर कठोर कारवाईची मागणी
नाशिक: शहरात वाढत्या नशाखोरी, अमली पदार्थ विक्री आणि हुक्का पार्लरमधील अनैतिक कृत्यांविरोधात हिंदू जनजागृती समितीने पोलीस प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
.%5B4%5D.jpg)
गंगापूर रोड, कॉलेज रोड, पंचवटी आणि इतर भागांत एमडी ड्रग्स, गांजा, कोकेन यांसारख्या मादक पदार्थांची विक्री वाढल्याने युवक-युवतींमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. रात्री १० नंतर पब, क्लब आणि हुक्का पार्लर बंद करावेत, मादक पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच विशेष पोलिस पथक तयार करावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
.%5B4%5D.jpg)
पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी या प्रकरणावर तातडीने कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
नाशिकमध्ये वाढत्या नशाखोरीवर कठोर कारवाईची मागणी
|