बातम्या
सात दिवसात पालकमंत्री, आमदार, अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा ; आक्रमक हिंदुत्ववादी संघटनेची महानगरपालिकेकडे मागणी
By nisha patil - 12/22/2023 4:56:25 PM
Share This News:
सात दिवसात पालकमंत्री, आमदार, अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा ; आक्रमक हिंदुत्ववादी संघटनेची महानगरपालिकेकडे मागणी
कोल्हापूर: पापाची तिकिटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक अपूर्ण असताना चुकीच्या पद्धतीने उद्घाटन केले, त्याबाबत सात दिवसात महापालिकेने पालकमंत्री ,आमदार ,माजी नगरसेवक, महापालिका अधिकारी, व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत. अनंता कोल्हापूरबरोबरच कागलमधीलही विकास कामांची उद्घाटने केली जातील, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी महापालिकेला दिला.
विविध हिंदुत्ववादी संघटनांतर्फे आज महापालिकेला निवेदन देऊन सहा दिवसाची मुदत दिली आहे. उपायुक्त शिल्पा दरेकर यांना या प्रकरणासह गांभीर्य पटवून दिले असून, अनेक वर्षांपासून हिंदू समाज व संघटना स्मारकासाठी झटत आहेत. त्याचे काम अजूनही अपूर्ण आहे पण राजकीय स्वार्थापोटी श्रेय लाटण्यासाठी काही नेत्यांनी उद्घाटन केले आहे. त्यातूनच हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. महापालिकेची जबाबदारी असताना या नेत्यांनी उद्घाटन केले तरी कसे? महापालिकेचे काही अधिकारी व ठेकेदाराने साथ दिली त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी.
निवेदन देऊन चर्चा केल्यानंतर गजानन तोडकर यांनी महापालिका प्रशासनाला गुन्हे दाखल करण्याची सहा दिवसांची मुदत दिली आहे या कालावधीत वरळीमध्ये जसे आमदार अधीर ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला तसाच येथे गुन्हा दाखल झाले नाहीत तर आठव्या दिवसांपासून शहरातील व कागल मधील कामाची उद्घाटने हिंदू समाज करे असे त्यांनी सांगितले.
यावेळी महेश उरसाल, अजित ठाणेकर, उदय भोसले, हिंदुराव शेळके, किशोर घाटगे, पंडित पवार, मनोहर स्वरूप आधी मान्यवर उपस्थित होते.
सात दिवसात पालकमंत्री, आमदार, अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा ; आक्रमक हिंदुत्ववादी संघटनेची महानगरपालिकेकडे मागणी
|