बातम्या
नैसर्गिक ओढ्यात बांधली भिंत, ग्रामसेवक कंत्राट दारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By nisha patil - 5/7/2023 7:45:16 PM
Share This News:
नैसर्गिक ओढ्यात बांधली भिंत, ग्रामसेवक कंत्राट दारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
कुंभोज प्रतिनिधी( विनोद शिंगे) आळते येथील गट नं १८२३ च्या दक्षिणेस व गट नं १४४४ च्या उत्तरेस असलेल्या नैसर्गिक ओढ्यामध्ये बेकायदेशीररित्या उभी भिंत बांधून नैसर्गिक स्त्रोत वर बाधा आणण्याचे काम केले आहे.
सदर प्रशासनाच्या नजरेत आणून दिली आहे. ग्रामपंचायतला यासंदर्भात पत्र दिले आहे. पण ग्रामसेवक चंदन चव्हाण यांना या विषयाची गांभिर्यता नसलेची दिसून येत आहे. सदर बांधकाम हे ग्रामसेवक चंदन चव्हाण व कंत्राटदार संपत पाटील यांच्याशी समन्वय करून ग्रामसेवक चंदन चव्हाण आपल्या पदाचा आर्थिक हितापोटी गैरवापर केला असावा, असा संशय आहे..
सदर बाबीमुळे अचानक आलेल्या पावसामुळे दोन्ही गटाच्या शेजारी मोठी हानी होण्याची शक्यता आहे. मुळतः नैसर्गिक स्त्रोतामध्ये ओढ्याचे पात्र मोठे आहे, आणि त्या पात्रालाच उभी आरसीसी भिंत घालून धोका निर्माण केलेला आहे.
सदर गोष्टीमुळे जर कोणती हानी झाली असता या प्रशासनाला दिलेल्या पत्राला ग्राह्य धरून गुन्हा दाखला व्हावा. आणि हे सर्व पत्र न्यायालयीन पुरावे म्हणून ग्राह्य धरावेत.
सदरचे नैसर्गिक ओढा पात्रात बांधलेली भित आपत्ती व्यवस्थापन अधिनियम च्या तरतुदी नूसार काढून टाकून जिवित हानी व वित्त हानी टाळावी. (पदाचा गैरवापर केल्यामूळे संबंधितांच्यावर गुन्हे दाखल करावेत) भविष्यात होणाऱ्या अनर्थाला टाळण्यासाठी कार्यालयाकडून कायदेशिर रित्या पंचनामा करून संबंधिताच्या बर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत आणि नैसर्गिक स्त्रोत मोकळा करावा अशि मागणी माजी उपसभापती प्रवीण जनगोंड यांनी केली आहे.
नैसर्गिक ओढ्यात बांधली भिंत, ग्रामसेवक कंत्राट दारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
|