विशेष बातम्या
अंबाबाई मंदिरमार्फत गरजू रुग्णांना २५ हजार रुपयांची मदत मिळविण्याची मागणी
By nisha patil - 1/26/2025 7:02:06 PM
Share This News:
अंबाबाई मंदिरमार्फत गरजू रुग्णांना २५ हजार रुपयांची मदत मिळविण्याची मागणी
कोल्हापूर - कोल्हापूरसह महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना अंबाबाई मंदिरामार्फत २५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.
.%5B3%5D.jpg)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया देऊन जिल्हाधिकारी यांना आवश्यक निर्देश दिले.
महाराष्ट्रातील अनेक मंदिर ट्रस्ट, जसे श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, दगडूशेठ गणपती ट्रस्ट, तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्ट, गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत पुरवतात. त्याचप्रमाणे अंबाबाई मंदिरानेही गरजू रुग्णांना कायमस्वरूपी २५ हजार रुपये वैद्यकीय मदत देण्यासाठी निवेदन सादर केले. यामुळे समाजातील गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.
या निवेदनाद्वारे अंबाबाई मंदिराची मदत रुग्णांसाठी महत्त्वाची ठरेल, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्याही उपस्थितीमध्ये नमूद करण्यात आले.
या मदतीमुळे अनेक रुग्णांना आर्थिक व मानसिक आधार मिळेल, अशी अपेक्षा आहे.
अंबाबाई मंदिरमार्फत गरजू रुग्णांना २५ हजार रुपयांची मदत मिळविण्याची मागणी
|