विशेष बातम्या

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याची मागणी - मंदिर महासंघाचे निवेदन

Demand to implement dress code in Shri Mahalaxmi Devi Temple


By nisha patil - 3/31/2025 3:05:29 PM
Share This News:



श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याची मागणी - मंदिर महासंघाचे निवेदन

कोल्हापूर - मंदिरे हिंदु धर्माच्या पवित्र आधारस्तंभ आहेत आणि त्या भक्तांना मानसिक शांती व अध्यात्मिक ऊर्जा प्रदान करतात. मंदिरांमध्ये सात्विक वेशभूषा अनिवार्य असून, पाश्‍चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे अनेकजण मंदिरांमध्ये असात्विक वेशभूषेत जात आहेत. यामुळे हिंदू संस्कृतीचा आदर राखण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्याची आवश्यकता आहे.

या संदर्भात, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या व्यवस्थापनास ३० मार्च रोजी मंदिर महासंघाने निवेदन दिले. यामध्ये, मंदिरात सात्विक वेशभूषा करूनच भाविकांनी येण्याची मागणी केली.

या निवेदनावर श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे व्यवस्थापक श्री. अनिल दिंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, "निवेदन स्वीकारल्यानंतर वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल."

यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संयोजक श्री. प्रमोद सावंत, सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याची मागणी - मंदिर महासंघाचे निवेदन
Total Views: 30