बातम्या
छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याची मागणी
By nisha patil - 6/12/2023 4:34:30 PM
Share This News:
छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याची मागणी
कोल्हापुरातील संभाजीनगर बस स्थानकास छत्रपती संभाजीनगर नामकरण करावे
परिवहन राज्यमंत्री असताना १० कोटींचा निधी मंजूर केला होता
अद्ययावत बसस्थानक जानेवारीपासून सुरु करण्याचा प्रयन्त
माजी परिवहन राज्यमंत्री आमदार सतेज डी. पाटील, आम ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील संभाजीनगर बस स्थानकाची पाहणी केली . अनेक वर्षी संभाजीनगर बसस्थानकाची दुरावस्था होती ,बंटी पाटील परिवहन राज्यमंत्री असताना त्यांनी या बस स्थानकाच्या दुरुस्तीसाठी तसेच सदरचे बस स्थानक अद्ययावत करणेसाठी १० कोटींचा निधी मंजूर केला होता त्याप्रमाणे संभाजीनगर बस स्थानकाचे कामकाज सुरु झाले ते आता पूर्णत्वाचे टप्पात आले आहे
कोल्हापुरात असलेले संभाजीनगर बस स्थानकास छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करावे असे पत्र शासनास दिले आहे ती मागणी पूर्ण होईल अशी अशा हि त्यांनी व्यक्त केली. सदरचे बस स्थानक जानेवारी पासून सुरु करावा असा मानस त्यांनी व्यक्त केला या बस स्थानकांमधून चार तालुक्यास जाणाऱ्या बसेस सुरु होतील तसेच नागरिकांच्या समस्या सुटतील असे मत व्यक्त केले
छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याची मागणी
|