बातम्या
कोल्हापुरात फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी
By nisha patil - 1/30/2025 11:58:27 AM
Share This News:
कोल्हापुरात फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी
कोल्हापूर शहरातील फुटबॉल शौकिनांसाठी एक महत्वाची बातमी. राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आ. अमल महाडिक यांनी निवेदन सादर करत कोल्हापुरातील निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.
तसेच, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फंडातून पाच कोटी रुपये खर्चून वसतीगृह उभारणीसाठी प्रस्ताव मांडला आहे. भरणे यांनी लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
कोल्हापुरात फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी
|