बातम्या
नरेंद्र मोदींमुळे लोकशाही धोक्यात
By nisha patil - 10/5/2024 4:56:40 PM
Share This News:
नरेंद्र मोदींमुळे लोकशाही धोक्यात आहे, मोदींनी सोरेन आणि केजरीवाल यांना तुरुंगात टाकलंय. गांधी-नेहरुंची विचारधारा आम्हाला मान्य आहे. हा देश एकसंघ ठेवायचा आहे, त्यासाठी सर्वच धर्मांना सोबत घेऊन पुढे जावे लागणार आहे. पंतप्रधानांनी एका धर्माविषयी वेगळी भूमिका घेतल्याचं दिसून आलं. एका समाजाविरुद्ध वेगळी भूमिका मांडल्यास ऐक्य राहणार नाही, असे म्हणत शरद पवारांनी मोदींच्या ऑफरवर भाष्य केलं. लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांसोबत जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात पवारांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या विलिनीकरणाच्या विधानावर भाष्य केले. मोदी म्हणाले की, गेल्या 40 ते 50 वर्षांपासून महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते राजकारणात सक्रीय आहेत. ते सध्या काहीही बोलत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत गेले असून त्यांनी अनेक लोकांसोबत विचार करुन असं वक्तव्य केले असावे असं मला वाटतं. चार जूननंतर सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये टिकून राहायचं असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल असं त्यांना वाटत आहे. याचा अर्थ नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावे आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावे, अशी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली आहे. आता यावर ठाकरे आणि पवार यांच्याकडून काय प्रत्युत्तर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नरेंद्र मोदींमुळे लोकशाही धोक्यात
|