बातम्या
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने : जुन्या पेन्शनची मागणी
By nisha patil - 12/14/2023 3:37:00 PM
Share This News:
जुनी पेन्शन लागू करा, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील ६५ हजार सरकारी, निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आजपासून होणाऱ्या संपात सहभाग घेणार आहेत.
काल रात्री सीपीआर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद करत सीपीआरच्या आवारात जोरदार निदर्शन केली. आज हे सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद करत निदर्शन करणार आहेत.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यामागणीसाठी सरकारी शिक्षक-शिक्षकेतर निमसरकारी, कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने येत्या १४ तारखेपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. या संपात १७ लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. १४ तारखेपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. या संपात १७ लाख कर्मचारी सहभागी होणार आहेतकर्मचाऱ्यांच्या या मागणीबाबत शासन सकारात्मक असून येत्या निवडणुकीपूर्वी याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या वतीने विधिमंडळात दिल्यानंतरही कर्मचारी बेमुदत संपाच्या मागणीवर ठाम आहेत. सरकारी निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन-भत्ते सेवानियम याबाबतीत ते केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे आहेत. कामाचे स्वरूप समान आल्यामुळे केंद्रासमान वेतन-भत्ते सेवाशर्ती असाव्यात असा आग्रह अनेक आंदोलनाच्या माध्यमातून त्यावेळी राज्य शासनाकडे धरण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने : जुन्या पेन्शनची मागणी
|