बातम्या

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत डेंग्यू रुग्ण मोहीमेला सुरुवात

Dengue patient campaign started by Kolhapur Zilla Parishad


By nisha patil - 5/27/2024 8:26:00 PM
Share This News:



जिल्ह्यात डेंग्यू रुग्ण संख्येत होणाऱ्या वाढीचे कारण म्हणजे मोठी धरणे, लहान, छोटे, मध्यम प्रकल्प व त्यामुळे बागायती शेतीची झालेली वाढ त्या अनुषंगाने स्थापन झालेले साखर कारखाने तसेच औद्योगिकीकरण व शहरीकरण यामुळे मोठ्या प्रमाणात बाह्य मजुरांची म्हणजेच परराज्यातुन व परजिल्ह्यातून येणारे मजूर ही संख्या फार मोठी आहे. जिल्ह्यात विविध कामासाठी ऊसतोड मजुर, विटभट्टी कामगार व औद्योगिक कामासाठी जवळजवळ 80 हजार ते 1 लाख बाह्यमजुरांची ये जा होते. हे मजुर मुख्यत्वेकर कर्नाटक आंध्रप्रदेश, यु पी, बिहार व महाराष्ट्रातील हिवतापग्रस्त भागातून आलेले असतात. या समस्येवर उपाययोजना करणे महत्वाचे आहे. यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत डेंग्यू रुग्ण मोहीम सुरु करण्यात आली आहे.

 

किटकजन्य आजार व होणारे मृत्यू हे सर्वांनी सामुहीक प्रयत्नातून टाळता येऊ शकतात. डेंग्यू लागण झालेल्या रुग्णांना रुग्णांच्या कौटुंबीक परिस्थितीवर खुपच मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागतो. खासगी रुग्णालयात या रुग्णांचा खर्च एक लाख ते सव्वा लाख इतका येतो. शिवाय डेंग्यूमध्ये मृत्युचे प्रमाण जास्त आहे. ज्या गांवामध्ये मागील वर्षी साथ उद्रेक झालेली आहे त्याठीकाणी विषेश दक्षता घेण्यात यावी लागणार आहे.

 

डेंग्यू हा एडिस इजिप्ती डासापासून होतो. या डासाचे जीवानचक्र कालावधी 7 ते 10 दिवस असतो. दोन आठवडे ते एक महिना अशी या डासाची आयुष्य मर्यादा असते. हा डास दिवसा चावतो. स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतात. जसे प्लॅस्टीक कंटेनर, प्लॅस्टीक ड्रम्स, मातीचे रांजण, माट, रिकाम्या टायर, पाण्याच्या टाक्या इ. हा डास दिवसा एकाच वेळी अनेक जणांना चावू शकतो. चावल्यानंतर भिंतीवर न बसता घरातील अडगळीच्या ठिकाणी प्रामुख्याने टेबलाखाली टांगलेल्या कपडयाच्या मागे घरातील ओलाव्याच्या ठिकाणी थांबतो.

 

ऍनाफिलीश या डासापासूनही डेंग्यू होतो. या डासाचे जीवानचक्र कालावधी 8 ते 10 दिवस असतो. तीन आठवडे ते एक महिना अशी या डासाची आयुष्य मर्यादा असते. हा डास रात्री चावतो. पाण्यात अंडी घालतात. पाण्याचे डबके, विहीरी, पावसाचे साचलेले पाणी, पाण्याचे साचे टाक्या, ड्रम, जंगलातील पाण्याचे झरे, झिरपणारे पाणी, नारळाच्या करवंट्या, टायर, गटर, दलदल या ठिकाणी अंडी घालतात.

 

डेंग्यू आजाराचे अधिशन काळ व लक्षणे-

डेंग्यू हा एडिस इजिप्ती डासापासून होतो. याचा अधिशया काळ 5 ते 6 दिवस असतो.  यामध्ये रुग्णाला तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, डोळयाच्या खोबणीमध्ये वेदना, हाड मोडल्यानंतर होणाऱ्या वेदनेप्रमाणे अंगभर तीव्र वेदना.

डेंग्यू रक्तस्त्राव ताप - वरील लक्षणासह रक्तातील प्लेटलेट कमी झाल्याने शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव होतो. उदा. नाकातून रक्तत्राव, रक्ताची उलटी होणे, हिरड्यामधून रक्तत्राव या प्रकारामध्ये मृत्युचे प्रमाण पहिल्या प्रकारापेक्षा जास्त असते.

डेंग्यू शॉक सिंड्रोम - वरील दोन्ही प्रकारातील सर्व लक्षणे तसेच तरुणाच्या शरीरातील रक्त व पाणी कमी झाल्यने रुग्ण बेशुध्द होतो रुग्णाचा रक्तदाब कमी होतो. नाडीचे ठोके अतिजलद होतात. रुग्णाची त्वचा कोरडी व थंड पडते या प्रकारामध्ये वरील दोन्ही प्रकारापेक्षा मृत्युचे प्रमाण जास्त असते.

 

हिवताप- हा ऍनाफिलीस डासापासून होतो. याचा अधिशया काळ 10 ते 12 दिवस असतो. यामध्ये रुग्णाला  थंडी वाजून ताप येणे, तीव्र ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, घशाला कोरड पडणे, डोळे दुखी, मळमळ उलटी होणे, पानतळी (Spleen) सुज येणे अशी लक्षणे आढळतात.

चिकनगुणिया -हा एडिस इजिप्ती डासापासून होतो. याचा अधिशया काळ 7 ते 10 दिवस असतो. यामध्ये रुग्णाला तीव्र ताप, तीव्र सांधे दुखी, डोके दुखी, अंग दुखी अशी लक्षणे आढळतात.

 

विविध स्तरावर समिती जबाबदा-या-

 

जिल्हास्तरीय समिती

 मुख्य कार्यकारी अधिकारी - दरमहा आढावा बैठक घेऊन योग्य ते कार्यवाहीसाठी आदेशीत करणे.

अति.जि.आ.अ. जिल्हा हिवताप अधिकारी यांचे कडुन दरमहा 7 तारखेला अहवाल घेऊन अहवालाचे विश्लेषण व योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना या बाबत मु.का.अ. / जि.आ.अ. यांना अवगत करणे.

जि.आ.अ. अहवालाचे विश्लेषण योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे करिता कार्यवाही करणे.

उप.मु.का.अ. ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोगातील आरोग्य विषयक अनुदानाचा विनियोग बाबत गटविकास अधिकारी यांना अवगत करणे.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता संपुर्ण स्वच्छतेबाबत तालुकावार अहवाल मु.का.अ. व जि.आ.अ. यांना सादर करणे.

जिल्हा हिवताप अधिकारी जिल्हयातील प्रत्येक गांवनिहाय मागील तीन महिन्याचा तुलनात्मक ए.पी.आय. इंडेक्स अहवाल, कंटेणर सव्हें अहवाल, डासोत्पत्ती स्थाने व करणेत आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना गांव निहाय दरमहा 7 तारखेला मा.जि.आ.अ. यांना सादर करणे.

 कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा पिण्याच्या पाण्याची देखभाल दुरुस्ती व स्वच्छता योग्यती खबरदारी घेणे.

 शिक्षणाधिकारी प्राथमिक / माध्यमिक प्रभावी जनजागृतीसाठी मा.मु.का.अ. यांच्या आदेशाने आलेल्या सुचनांचे पालन करुन अहवाल सादर करणे.

 

तालुकास्तरीय समिती -

गट विकास अधिकारी- तालुकास्तरीय समितीची बैठक घेऊन बाब निहाय आढावा घेणे. तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून गावांवर अहवाल संकलन विश्लेषन व मागोवा करणे व गट विकास अधिकारी यांना अवगत करणे.

आरोग्य पर्यवेक्षक -तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सुचनेनुसार कामकाज पाहणे, बैठकीचे आयोजन करणे, अहवाल संकलन व सदरीकरण करणे.

विस्तार अधिकारी (पंचायत)- आरोग्य विषयक खर्च 14 वित्त आयोगामधून उपलब्ध करुन साथ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे / केले बाबत ग्रामपंचायतीचा आढावा घेणे व अहवाल देणे.

गट समुह संघटक स्वच्छता -तालुक्याने संपुर्ण स्वच्छतेचा मासिक अहवाल गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना देणे, जनजागृती करिता मा.मु.का.अ. यांच्या आदेशाने आलेल्या सुचनांचे पालन करुन अहवाल सादर करणे.

शाखा अभियंता पा.पु.- पिण्याच्या पाण्याची देखभाल दुरुस्ती व स्वच्छता.

गट शिक्षण अधिकारी -जिल्हास्तरीयकडून आलेल्या जाजागृत्तीबाबत आलेल्या सुचनांची अंमलबजावणी करणे.

 

 गावस्तरीय समिती -

सरपंच- पाणीपुरवठा व स्वच्छता समिती व ग्रामसेवक यांना आरोग्य विषयक बाबी बाबत  दिलेल्या सुचनेनुसार गावातील डासोत्पत्ती स्थाने दलदल, तुबंलेली गटारे वाहती करणेसाठी लोकसहभाग व शासकीय योजना याद्वारे पार पाडणे.

कोरडा दिवस (ड्राय डे)- याबाबत गावातील जनतेमध्ये जनजागृत्ती व अंमलबजावणी करणे.

सर्वच शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बसवणे.

आरोग्य सेवक पु.- गावातील दलदलीची ठिकाणे, डासोत्पत्ती स्थाने, (उदा. न वापरात असणारे पाणी साठे, रिकाम्या टायर्स नारळाच्या करवंट्या, रिकामी डबकी इत्यादी) बाबत ग्रामपंचायतीस लेखी अवगत करणे.

महिन्यातून दोन वेळा गृहभेटी देऊन ताप आलेल्या व येऊन गेलेल्या रुग्णांचे रक्तनमुना संकलन करणे.

कंटेनर सर्व्हे नियमित करणे, डासोत्पत्ती स्थानामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणणे (उदा. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गप्पीमासे सोडणे, जळके ऑईल ओतणे, फॉगींग करणे)

 गावांचा किटकजन्य आजाराबाबतचे अहवाल दरमहा सादर करणे.

 

आजारावर नियंत्रण-

जनतेचा सहभाग - आतापर्यत देवी, नारु य रोगांचे समुळ उच्चाटन झाले आहे. पोलीओ व कुष्ठरोग निर्मुलनाच्या उंबरठ्यावर उभा आहे कारण जनतेने हे आजार स्विकारले. असेच जनतेने डेंग्यू, हिवताप व चिकन गुनिया स्विकारायला हवेत. कारण जोपर्यंत जनतेचे परिपूर्ण सहकार्य मिळत नाही तोपर्यत किटकजन्य आजारावर नियत्रंण मिळणे शक्य नाही. व्यक्तिगत उपाययोजना आपल्या घरातील सभोवतालची दैनंदिन स्वच्छता. घराभोवती सांडपाणी साचून दलदल होणार नाही यांची दक्षता घेणे. प्रत्येक घरामध्ये शोष खड्डा, परसबाग यांची निर्मिती करणे. घरामध्ये हवा व सुर्यप्रकाश खेळता राहील अशी व्यवस्था करणे. शौचालयाचे सेप्टीक टॅंक हे डासांचे उत्पत्ती स्थान असल्याने व्हॅन्ट पाईपला जाळी बसवणे. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे.  घराभोवतालची गटारे वाहती करणे. बायोगॅस लहरीमध्ये जळके तेल अथवा रॉकेल टाकणे.

सांघीक प्रयत्न - स्थानिक स्तरावर शिबीरे आयोजीत करुन जनतेला किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करणे.

सार्वजनिक सांडपाणी, गटारी यांची योग्य विल्हेवाट लावणे. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे. ग्रामपंचायत मार्फत खड्डे मुजवणे. गप्पी मासे मोठया प्रमाणात सोडणे.आवश्यकता भासल्यास धुर फवारणी करणे. स्वयंसेवी संस्था, आशा कर्मचारी, खासगी दवाखाने यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी करुन घेणे. 

शासकीय यंत्रणेच्या जबाबदाऱ्या- कोणत्याही रोगांचे नियत्रंण हे नियमित सर्वेक्षणावर आधारित असते. सर्वेक्षण करणे, माहितीचे पृत्थकरण करणे व त्यावर उपायोजना करणे हे किटकजन्य रोगनियत्रंण पायाभूत घटक आहेत.

 निदान तत्पर उपचार सत्वर या सुत्रानुसार वेळेवर रक्त नमुना घेणे. वेळेवर प्रयोगशाळेत तपासणी व समुळ उपचार. 15 दिवसांतुन एकदा गृहभेटी करुन नवीन तापाचे रुग्ण शोधणे व मागील 15 दिवसात ताप आलेल्याचे रक्तनमुने घेणे. आवश्यकतेने आर.डी. के. किट्सचा वापर करणे.  ए.पी.आय. इंडेक्स Annual Parasite Index जास्त असणाऱ्या गांवामध्ये योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणणे. कंटेनर सर्व्हे नियमित करणे व आवश्यक त्या उपायोजना करणे.

 

उपाययोजना -

 एक डासाची मादी आयुष्यामध्ये 150 ते 200 डासांची उत्पत्ती करते. जैविक (अळी नियत्रंण)- साचलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडणे. साधारणपणे 4 ते 6 जोडया एक चौरस मीटर पाण्याच्या पृष्ठ भागावर सोडल्यास डासोत्पत्तीस आळा बसतो. एक गप्पीमासा 24 तासांत 40 ते 50 डासांच्या आळ्या खातो.

कोष नियत्रंण - साचलेल्या पाण्यावरती जळके तेल किंवा रॉकेल सोडणे. त्यामुळे कोषातुन बाहेर येताना ऑक्सीजनचा पुरवठा न झाल्याने नियत्रंण होते.

डास नियत्रंण - गावामध्ये धुर फवारणी करुन घेणे.

 

जबाबदाऱ्या

वैद्यकीय अधिकारी - कार्यक्षेत्रातील सर्व गावांचे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन सर्वेक्षण होऊन रक्तनमुने संकलन उदिष्ट गुणवत्ता पुर्वक सनियत्रंण करणे. बाह्यरुग्ण विभागामध्ये आलेल्या रुग्णाचे रक्तनमुने संकलन करणे. आपल्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण गावांचा स्वच्छता विषय सर्व्हे करुन 14 व्या वित्त आयोगातुन किटकजन्य, जलजन्य आजार, पुरपरिस्थिती याबाबत गावनिहाय नियोजन करुन ग्रामपंचायतीस लेखी कळविणे.

 आरोग्य सहाय्यक - आपल्या कार्यक्षेत्रातील रक्त नमुने पडताळणी करणे. डासोत्पती स्थानांची माहिती घेऊन योग्यत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणणे.

 आरोग्य सेवक - डासोत्पती स्थानांची माहिती घेऊन योग्यत्या प्रतिबंधात्मक उपायोजनांचा अंमल करणे इ. जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.


कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत डेंग्यू रुग्ण मोहीमेला सुरुवात