बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला वंदे भारत ट्रेनचा प्रवास

Deputy Chief Minister Ajit Pawar traveled by Vande Bharat train


By nisha patil - 7/15/2023 6:47:15 PM
Share This News:



उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला वंदे भारत ट्रेनचा प्रवास

आज शनिवारी नाशिक येथे आयोजित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार  वंदे भारत ट्रेनने सकाळी नाशिककडे रवाना झाले.ट्रेन मध्ये  नेहमी प्रमाणे वृत्तपत्रे वाचत अजित पवार यांचा प्रवास सुरु झाला. मात्र या प्रवासात सहप्रवासी असलेले एक  ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी येऊन बसले. "दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर...अशीच जनतेची कामे करा, बेस्ट लक दादा"...  अशा शब्दात त्यांनी जणू राज्यातल्या जानेतेचीच प्रतिनिधीक भावना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा जे शक्य आहे, लोक हिताचे आहे ते करत राहणार, काही सूचना असतील तर करा असे सांगत आपल्या सोबत असणाऱ्या विशेष कार्य अधिकाऱ्यांना त्यांची नोंद घेण्यास सांगितले. प्रवासात इतर प्रवाशांना त्रास होऊ नये, कोणाला अडवू नका अशा सूचना  आपल्या सुरक्षा राक्षकांना केल्या.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला वंदे भारत ट्रेनचा प्रवास