बातम्या

जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिळाली डॉक्टरेट पदवी

Deputy Chief Minister Devendra Fadnavis received his doctorate degree from Koyasan University Japan


By neeta - 12/27/2023 3:27:29 PM
Share This News:



जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिळाली डॉक्टरेट पदवी

मानद डॉक्टरेट पदवी राज्यातील जनतेला समर्पित - उपमुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील जनतेचा आशीर्वाद वरिष्ठ सहकाऱ्यांची साथ यांच्यामुळे जपान मधील कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टर पदवी मला मिळाली. ही पदवी मी माझ्या महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करत असून, 2035 मध्ये 75 वर्षे पूर्ण करीत असलेल्या महाराष्ट्राच्या विकासाचे चित्र बदलले असणार आहे. जे राजासाठी आणि देशासाठी चांगले करता येईल ते मी करत राहील अशा भाऊंना उपमुख्यमंत्री डॉक्टर देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.


  मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात उपमुख्यमंत्री फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. हा कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा झाला. यावेळी अतिशय भावनिक मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राजाच्या पुढील विकासाचा रोड मॅप सादर केला.


यावेळी व्यासपीठावर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, कोयासन विद्यापीठाचे प्रो. इण्युई रूनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामा सीता योशिओ, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फूकाहोरी यासुकाता आदी उपस्थित होते.
   यावेळी मुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस म्हणाले, जपानी सातत्याने भारताला आणि महाराष्ट्राला मदत केली आहे. जपान हा आपला अतिशय जवळचा आणि विश्वासू मित्र आहे. त्यामुळेच हा केवळ मैत्रीचाच नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्या जोडणारा अध्याय आहे. कोयासन विद्यापीठाने डॉक्टर देताना पायाभूत विकास, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समता या गोष्टींचा विचार केल्याचे ते म्हणाले.
   मुंबईच्या पायाभूत क्षेत्र विकासात जपानचा मोठा वाटा आहे. आगामी काळात वर्सोवा ते विरार ही सी लिंक तयार करण्याची तयारी सुरू आहे. यासाठी ही त्यांची मदत घेतली जाणार आहे. महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत क्रमांक एकचे राज्य आहे. त्यामुळे देशात आपल्या राज्याला अधिक ठळक महत्त्व असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल झाले आहे. आपण 2014 ते 2019 मध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम केले. त्यामुळे देशाच्या तुलनेत राज्यातील जमिनीची पाणी पातळी उंचावण्यास मदत झाल्याचे ते म्हणाले.
   उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले, आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असा हा कार्यक्रम आहे.यावेळी  डॉ. फुकाहोळी यासुकाता  म्हणाले की, डॉ. फडणवीस यांनी जपान चा दोरा केला अनेक उद्योजकांना भेटले त्यानंतर अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.


जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिळाली डॉक्टरेट पदवी