बातम्या

कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जल्लोषात स्वागत; अंबाबाईचे घेतले दर्शन

Deputy Chief Minister Eknath Shinde welcomed in Kolhapur


By nisha patil - 1/25/2025 8:25:18 PM
Share This News:



कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जल्लोषात स्वागत; अंबाबाईचे घेतले दर्शन

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी विधानसभा निवडणुकीतील यशानंतर प्रथमच कोल्हापुर दौऱ्यावर येऊन आई अंबाबाईचे दर्शन घेतले. कोल्हापूर विमानतळावर युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव व जयश्री चंद्रकांत जाधव (शिवसेना उपनेत्या) यांनी महालक्ष्मीची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडे, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, उदय सावंत, सत्यजित कदम (नाना), ललीत गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याने जिल्ह्यात नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे.


कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जल्लोषात स्वागत; अंबाबाईचे घेतले दर्शन
Total Views: 74