बातम्या
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक राऊत संतापले
By nisha patil - 12/2/2025 4:26:44 PM
Share This News:
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक राऊत संतापले
शरद पवारांच्या शिंदे सत्कारावर संजय राऊत आक्रमक!
शरद पवार यांनी दिल्लीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्याने शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राऊत यांनी यावर टीका करत म्हटले की, "ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली, महाराष्ट्राला कमजोर केले, त्यांचा सत्कार करणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारे आहे."राऊत यांनी पवारांना लक्ष्य करत सांगितले की, "आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो. पण दिल्लीतील राजकारण वेगळं असलं तरी आम्हालाही राजकारण कळतं." शरद पवार यांच्या भूमिकेमुळे मराठी माणसाच्या मनाला वेदना झाल्या असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक राऊत संतापले
|