बातम्या

पोलीस उपअधीक्षक पदी परीक्षेत ओंकार गवळीचे यश

Deputy Superintendent of Police Security Omkar Gawliket Yash


By nisha patil - 3/21/2024 12:47:58 PM
Share This News:



शिरढोण प्रतिनिधी   (संजय गायकवाड) /ता.२१ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ऑक्टोंबर 2023 मध्ये पोलीस उपअधीक्षक  परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत ओंकार शांतिनाथ गवळी  ( वसगडे तालुका करवीर )यांने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. याबद्दल ओंकारचे  सर्वत्र कौतुक केले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी ही कोणताही क्लास न लावता यश मिळवू शकतो  हे दाखवून दिले. असून यश कुणाची मक्तेदारी नाही प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास आणि जिद्द कायम ठेवल्यास यश निश्चित मिळते हे ओंकार याने दाखवून दिले आहे.
   

वसगडे सारख्या ग्रामीण भागात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या ओंकारने  पहिल्याच प्रयत्नात  पोलीस उपाधीक्षक, दुय्यम निबंधक, आणि मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी या तिन्ही  परीक्षेत यश मिळवून "हम भी किसीसे कम नही" हे ओंकारने दाखवून दिले. सुरुवातीपासूनच आपणही शासकीय सेवेत जाऊन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर  कठोर परिश्रमा शिवाय पर्याय नाही  याची जाणीव ओंकारला सुरुवाती पासून होती.आणि याच अधिकारी होण्याच्या ध्येयाने ओंकारला झपाटले होते. 
   

बहीण सीमा गवळी हिची देखील विक्रीकर निरीक्षक व सहाय्यक गटविकास अधिकारी पदी निवड  झाली असून सध्या ती सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहे.सीमा व ओंकार या बहिण भावानीं कोणताही क्लास न लावता घरीच अभ्यास करून या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे.
 

वडील शांतिनाथ गवळी गाड्यांचे कोचिंग काम करतात तर आई मनीषा गवळी शिलाई काम करते  आई वडील यांनी शिक्षणासाठी ओंकारला कायम प्रोत्साहन दिले. सहा महिन्यात बहिण भावांनी तीन स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवले. कष्टातून यश  मिळवल्यानंतर त्याचा काय रुबाब असतो हे सीमा व ओंकार यांनी दाखवून दिले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श ठेवला आहे.ओंकारचे प्राथमिक शिक्षण बालसंस्कार विद्यालय वसगडे, माध्यमिक शिक्षण बापूसाहेब पाटील हायस्कूल वसगडे, उच्च माध्यमिक शिक्षण राजाराम महाविद्यालय कोल्हापूर, पदवी(बीएससी ऍग्री)शिक्षण राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे केली पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर घरीच अभ्यास चालू केला.
   

अभ्यास करताना अनावश्यक गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून फक्त आपल्या ध्येयावर ठाम राहिला. ओंकारला या स्पर्धा परीक्षेसाठी आई ,वडील आणि बहीण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


पोलीस उपअधीक्षक पदी परीक्षेत ओंकार गवळीचे यश