ताज्या बातम्या

डर्मा लॅबचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन.

Derma Lab inaugurated by Union Minister Nitin Gadkari


By nisha patil - 2/18/2025 4:25:04 PM
Share This News:



डर्मा लॅबचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन.


गडकरींनी जपले ऋणानुबंध


कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील डर्मा लॅबचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी डर्मा लॅबच्या संचालिका डॉ. नुपूर पाटील-खतळकर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खा. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, खा. विशाल पाटील, आ. अमल महाडिक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी डर्मा लॅबच्या संचालिका डॉ. नुपूर पाटील-खतळकर आणि डॉ. राहुल पाटील यांचे अभिनंदन करुन ना.गडकरी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आजकालच्या माहीती तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान खुप प्रगत झाले असून याच तंत्रज्ञानासह आत्याधुनिक सेवा आणि सुविधा देण्यासाठी कोल्हापूरात नव्यानेच सज्ज झाले आहे. डॉ. नुपूर राहुल पाटील खळतकर यांचे डर्मा लॅब स्किन क्लिनिक आणि डॉ. राहुल पाटील यांचे अथ्रायटिस अँन्ड हुमॅटॉलॉजी सेंटर नागाळा पार्क, कलेक्टर ऑफीस समोर सुरू केलंय.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय राजकारणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अनेक कुटुंबांशी जोडलेले ऋणानुबंध मंत्री नितीन गडकरी मनमुराद जपल्याचा प्रत्यय आलाय. नागपूरचे खळतकर कुटुंब आणि गडकरी यांच्यातील जिव्हाळा गेली 45 वर्ष कायम आहे. खळतकर कुटुंबातील डॉ. नुपूर यांनी कोल्हापुरात स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं. वैद्यकीय शिक्षण घेत असताना नुपूर यांना मंत्री गडकरी यांनी तुझ्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला नक्की येईन, असा शब्द दिला होता आणि तो त्यांनी पूर्ण केला.


डर्मा लॅबचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन.
Total Views: 62