बातम्या

वेगळा विषय असूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस

Despite the different subject matter this film is liked by the audience


By nisha patil - 9/5/2024 7:20:53 PM
Share This News:



संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात हा चित्रपट यशस्वीही झाला. केवळ प्रेक्षकच नाही तर श्रीधर फडके, आशा भोसले यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात,"परदेशात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काही शोज हाऊसफुल्ल झाले होते. महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच परदेशातील प्रेक्षकही इतके प्रेम या चित्रपटावर करत आहेत, हे खरंच भारावणारे आहे. बाबूजी हे नावच इतके मोठे आहे की, त्यांची ख्याती जगभरात आहे. आजही त्यांची गाणी अजरामर आहेत. तरुणाईही त्यांची गाणी तितक्याच आत्मीयतेने ऐकते. चित्रपटाबद्दल अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सगळ्याच कलाकारांचे कौतुक होत आहे. एका टीमला यापेक्षा जास्त काय हवे. मी सगळ्याच प्रेक्षकांचा मनापासून आभारी आहे".


वेगळा विषय असूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस