बातम्या

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांचेशी कोल्हापूर प्रश्ना बाबत सविस्तर चर्चा

Detailed discussion on Kolhapur issue with Manoj Jarange


By nisha patil - 8/27/2024 9:29:27 PM
Share This News:



कोल्हापूर 26-आज अतरावली सराटी येथे कोल्हापूर सकल मराठा समाज समन्वयकाचे शिष्टमंडळाने  मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील ह्यांची भेट घेऊन मराठा आरक्षण व कोल्हापूरचे प्रश्नावर दीर्घ चर्चा केली. यावेळी समन्वयक प्रसाद जाधव हृयांनी मराठा समाजाचे प्रश्न मग ते शेतकरी, शेतमजूर, कामगार, आणि विद्यार्थी, महिला ह्यांच्या प्रश्न मांडून आंदोलनाची दिशा विशद केली अनेक ठिकाणी कुणबी,ईसीबीसी सारखे दाखले मिळण्यात अडचणी, पोलिस भरती मधे झालेला अन्याय तसेच अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर सांगली मधे पूरपरिस्थिती दरवर्षी ओढावते, तसेच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर शहरासह  जिल्ह्यातील सविस्तर राजकीय चर्चा  करण्यात आली .तर शहरासह व अन्य तालुक्यात संभाव्य उमेदवाराबाबत चर्चा करून निवडणूक काही इच्छुकांचे परिचय पत्र देण्यात आले. यावेळी प्रसाद जाधव, संजयसिंह साळोखे, वैभवराज राजे भोंसले, संजय देसाई, जितेंद्र पाटील, निलेश सुतार, नंदू घोरपडे,तुळजापूरचे समन्वयक आबा कापसे, जालन्याचे समन्वयक गणेश गुजर, राजेंद्र थोरवडे , गौरव लांडगे , स्वनिल सरगाटे इत्यादी शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली.


अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांचेशी कोल्हापूर प्रश्ना बाबत सविस्तर चर्चा