राजकीय
"विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीचा सत्ता स्थापन करण्याचा निर्धार – नाना पटोले"
By nisha patil - 11/22/2024 9:56:43 PM
Share This News:
"विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीचा सत्ता स्थापन करण्याचा निर्धार – नाना पटोले"
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी बहुमत मिळवेल असा ठाम विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. निकालानंतर लगेच सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे पत्र सादर केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी संवाद साधताना पटोले म्हणाले, "मतमोजणी दरम्यान कुठलीही अनियमितता होऊ नये म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. जिंकलेली निवडणूक गडबडीत हरण्याचे उदाहरण आपल्याला पूर्वी दिसले आहे."
पटोले पुढे म्हणाले, "आमचे आमदार कुठेही जाणार नाहीत. निकालानंतर सर्व आमदारांना मुंबईत बोलवून त्यांच्याकडून सह्या घेतल्या जातील. जमल्यास उद्या रात्रीच राज्यपालांकडे सत्तास्थापनेचे पत्र सादर करण्याची आमची तयारी आहे."
त्यांनी असेही नमूद केले की, "26 तारखेला विद्यमान सरकारचा शेवटचा दिवस असेल. उद्या दुपारपर्यंत स्पष्ट चित्र समोर येईल आणि महाविकास आघाडी सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेईल."
महाविकास आघाडीने निवडणुकीत बहुमत मिळवून राज्यात सत्ता स्थापन करणे हा आत्मविश्वास पटोले यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे.
"विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीचा सत्ता स्थापन करण्याचा निर्धार – नाना पटोले"
|