राजकीय
मतासाठी शपथ घेणाऱ्या उमेदवाराला मतदान न करण्याचा स्वाभिमानी जनतेचा निर्धार : समरजीतसिंह घाटगे
By nisha patil - 11/16/2024 11:21:49 PM
Share This News:
मतासाठी शपथ घेणाऱ्या उमेदवाराला मतदान न करण्याचा स्वाभिमानी जनतेचा निर्धार : समरजीतसिंह घाटगे
: बानगेत जाहीर सभा
म्हाकवे,ता.१६: विरोधकांकडून मतदारांना विविध आमिषे दाखवली जात आहेत. देव देवतांच्या नावाखाली मतदारांच्या अंगारा, भंडाऱ्यावर शपथ घेण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची चर्चा मतदारसंघात उघडपणे सुरू आहे.
मताला शपथ द्यायची नाही. शपथ घेणाऱ्याला उमेदवाराला मत द्यायचे नाही. असा निर्धार कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी, सुज्ञ जनतेने केला आहे. असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांनी केले.
बानगे (ता.कागल) येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षांनी बाबुराव हिरुगडे होते.
समरजीतसिंह घाटगे म्हणाले,"छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराजांच्या लोकं कल्याणकारी राज्य कारभाराची प्रेरणा घेऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानात अनेक बाबींचा समावेश केला. त्यांनी दिलेल्या संविधानातील नागरिकांच्या मताच्या अधिकारानुसार नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मिळाला मताचा अधिकार अनमोल आहे.
कागल, गडहिंग्लज, उत्तुर विधानसभा मतदारसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान धोक्यात आले आहे. पालकमंत्र्यांना महिलांचा आदर करावा असे वाटत नाही. हसन मुश्रीफसाहेब दलित समाजाला आता तुमचे भावनिक भाषण नको आहे. तुमच्यामध्ये धाडस असेल तर पंचवीस वर्षात दलित समाजातील किती तरुणांना उद्योगधंदे उभारण्यासाठी सहकार्य केले हे जाहीरपणाने सांगावे.
सर्वसामान्य गरिबांची मुलं शिकणाऱ्या शाळेत शौचालय नाहीत. शाळांच्या इमारती धड नाहीत. कौले असणाऱ्या शाळातून पावसाळ्यात पाणी गळती होते. पंचवीस वर्षात मुश्रीफांनी शिक्षणासाठी निधी आणला नाही. नवीन शाळा बांधल्या नाहीत. मात्र त्यांनी कागलमध्ये स्वतःची खाजगी टुमदार शाळा बांधली. ती चकाचकी ठेवली. अशा पद्धतीची शाळा त्यांनी मतदारसंघात का बांधल्या नाहीत. याचे उत्तर येथील जनता या निवडणुकीत परिवर्तन करून मुश्रीफांना देईल.
स्वागत व प्रास्ताविक बाबुराव हिरुगडे यांनी केले. यावेळी अर्जुन माने, धनंजय पाटील, सागर कोंडेकर,युवराज पाटील, शिवानंद माळी, के.डी. पाटील, बाळासाहेब हेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस सागर पाटील, बाळासो मेटकर, युवराज बंगार्डे,विनायक रोकडे, तानाजी मोरे, रघुनाथ पाटील, ऋषिकेश जगदाळे विनोद जगदाळे रामदास तेली शरद भोसले बाबुराव मांगले आदी प्रमुख उपस्थित होते आभार सागर पाटील यांनी मानले.
नाचणारा मोर आणि पैशाचा खेळ जास्त काळ टिकत नाही.
माजी उपसरपंच धनंजय पाटील म्हणाले, आमच्या वहिनी साहेब सौ नवोदिता घाटगे कार्याध्यक्ष असणाऱ्या राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबीरे, हेल्थ फॉर हर तसेच महिलांच्या हातांना काम देणे. त्यांच्यासाठी विविध स्पर्धा घेणे हे काम सात्यपूर्ण गेली आठ वर्षे सुरू आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माऊली महिला संस्था पावसाळ्यात भूछत्र उगवते त्याप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर उगवते व नाहीशी होते. नाचणारा मोर आणि पैशाचा खेळ जास्त काळ टिकत नाही. जनतेने या सर्व गोष्टींचा विचार करून सातत्याने आरोग्य, शैक्षणिक, महिलांसाठी काम करणाऱ्या समरजीतसिंह घाटगे यांना या निवडणुकीत विजयी करावे.
मतासाठी शपथ घेणाऱ्या उमेदवाराला मतदान न करण्याचा स्वाभिमानी जनतेचा निर्धार : समरजीतसिंह घाटगे
|