बातम्या

डिटॉक्स पेय वजन कमी करण्यासाठी प्रभावी असतं

Detox drinks are effective for weight loss


By nisha patil - 7/18/2023 7:18:55 AM
Share This News:



सर्वांना ठाऊक आहे की निरोगी जीवनशैलीसाठी अन्न एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं, म्हणूनच आपल्याला या लेखात अश्या डिटॉक्स पेय बद्दलची माहिती देत आहोत ज्याचे सेवन केल्याने आपण निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत मिळेल.
हे पेय आहे जिरं, धणे आणि बडीशेप पासून तयार केलेले डिटॉक्स ड्रिंक. याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत करतात. त्याच बरोबर आपल्या त्वचेला मऊ, निरोगी आणि तजेल ठेवतात.
जिरं हे भारतीय मसाल्यातील एक महत्त्वाचा पदार्थ. पचनाशी निगडित सर्व त्रासांपासून मुक्त करतं. पाचक प्रणाली बळकट करतं. वजन कमी करण्यास उपयोगी आहे. उन्हाळ्यात पचन संबंधी त्रास होतात, तेव्हा जिरे सर्व त्रासांपासून मुक्त होण्यास मदत करतं. पोटॅशियम, कॅल्शियम आणि कॉपर सारखे पोषक घटकांनी समृद्ध असणारे जिरे आपल्या त्वचेला मऊ ठेवण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यास आणि त्वचेला तजेल करण्यास उपयोगी आहे धणे. धणे हे विविध प्रकाराचे खनिजे आणि व्हिटॅमिनचे चांगले स्रोत आहे. जे शरीरातील जास्तीचे वजन कमी करण्यास मदत करतं. धण्याच्या बियाणात अँटिसेप्टिकचे गुणधर्म असतात, जे त्वचे संबंधी अनेक त्रासांवरील उपचारासाठी प्रभावी ठरतात. म्हणूनच धण्यांचे सेवन उन्हाळाच्या दिवसात महत्त्वपूर्ण मानले गेले आहेत. कारण उष्णता आणि घामामुळे त्वचे वर जमलेले तेल त्वचेच्या समस्यांना जन्म देते.

वजन कमी करणे आणि त्वचेवर चमक यावी यासाठी उपयोगी ठरते बडीशेप. उन्हाळ्यामध्ये मुरूम होणे ही त्वचेशी निगडित साधारण समस्या आहे आणि बडीशेप त्वचेला थंड करण्यासाठी ओळखली जाते. या मध्ये जस्त, कॅल्शियम आणि सेलेनियम सारखे गुणधर्म असतात, जे शरीरामधील हार्मोन आणि ऑक्सिजनच्या पातळीचे संतुलन करण्यासाठी चांगले आहेत. त्वचेला निरोगी आणि तजेल बनवतात. त्याच बरोबर वजन कमी करण्यास मदत करते.

जिरे, धणे आणि बडीशेपेचे पाणी तयार करण्याची कृती :

अर्धा चमचे जिरे, धणे, बडीशेप 1 ग्लास पाण्यात भिजवून ठेवा.

दुसऱ्या दिवशी या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळून घेऊन पाणी गाळून घ्या.

काळे मीठ, मध आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये मिसळा. याचे सेवन करा.


डिटॉक्स पेय वजन कमी करण्यासाठी प्रभावी असतं