बातम्या
तीर्थक्षेत्र आराखड्याद्वारे श्री अंबाबाई मंदिर परिसराचा विकास साध्य करू : श्री.राजेश क्षीरसागर
By nisha patil - 11/2/2024 9:47:45 PM
Share This News:
कोल्हापूर दि.११ : कोल्हापूर येथील श्री.करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिर हे राज्यातील साडेतीन शक्तिपीठा पैकी एक मुख्य पीठ असून दररोज लाखो भाविक देवीच्या मंदिरात येत असतात. प्रत्येक सणासुदीच्या दिवशी श्री.करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेण्याची धार्मिक परंपरा आहे. त्यामुळे परराज्यातूनही लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात सणासुदीच्या दिवसामध्ये हि संख्या ५ लाखपर्यंत असते. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक दळणवळणाची साधने व पायाभूत सुविधांचा विकास झाले असलेने दिवसागणिक भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे त्यामुळे मंदिर परिसरातील उपलब्ध सोयीसुविधा तोकड्या पडत आहेत. नुकताच शासनाकडून श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले असून, वाराणसी आदी तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर आराखड्याद्वारे श्री अंबाबाई मंदिर परिसराचा विकास साध्य करून भाविकांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यास प्राधान्य देणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून को.म.न.पा.प्र.क्र.३३ महालक्ष्मी मंदिर अंतर्गत सरलष्कर भवन संत गाडगे महाराज पुतळा ते जोतीबा मंदिर येथे ड्रेनेज लाईन करण्याच्या कामास रु.२ कोटी ४७ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामांचा शुभारंभ आज भागातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी स्वागत माजी नगरसेवक आदिल फरास यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजीत जाधव, माजी नगरसेवक बाबा पार्टे, कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अच्युत साळोखे, युवराज साळोखे, परीख भाई, देवस्थान समितीचे महादेव दिंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, रिक्षा सेना शहरप्रमुख राजू पोवार, रहीम बागवान, निवास गायकवाड, राजू मोहिते, सोमनाथ शंकरदास आदी भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तीर्थक्षेत्र आराखड्याद्वारे श्री अंबाबाई मंदिर परिसराचा विकास साध्य करू : श्री.राजेश क्षीरसागर
|