बातम्या
चारित्र्य व नेतृत्व गुण विकास म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना
By nisha patil - 2/10/2024 4:41:39 PM
Share This News:
राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होऊन राष्ट्रविकासाबरोबरच सहभागी स्वयंसेवकाचा चारित्र्य व नेतृत्व गुण विकास होतो. आजच्या तरुणाला समाजसेवेचा लढा लागला पाहिजे तरच तो सर्वगुणसंपन्न बनवून देशाचे व आपले मनोबल वाढवू शकतो. राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून सहभागी होताना या योजनेची ध्येय व उद्दिष्टे कोणती ? याविषयीचा सविस्तर अभ्यास केल्यानेच आपण या योजनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, व्यक्तिमत्व विकास व मनाची शुद्धता इत्यादी गुणांचा सर्वतोपरी विकास होऊ शकतो. माणूस घडविण्यासाठी आजच्या युगामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे व्रत धारण करणे अत्यंत आवश्यक आहे. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे रा.से योजनेचे संचालक डॉ. तानाजी चौगले यांनी केले. ते विवेकानंद कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वर्धापन दिन समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कॉलेजमधील मराठी विभाग प्रमुख डॉ.ई.बी.आळवेकर हे होते.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. आळवेकर म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होऊन श्रमसंस्काराला प्रतिष्ठा देता येते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून परिसर स्वच्छतेबरोबरच मनाचीही स्वच्छता करता येते. असे विचार मांडले.
या कार्यक्रमाची सुरुवात रोपास पाणी घालून व शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. या समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. एल एस नाकाडी यांनी केले. कार्यक्रम अधिकारी डॉ.बी. टी.दांगट यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी श्री पी आर बागडे, डॉ.राजश्री पाटील, डॉ.अभिजीत पाटील उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी श्री संदीप पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ.संपदा टिपकुर्ले यांनी सूत्रसंचालन केले. कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांच्या बहुमोल मार्गदर्शनातून हा कार्यक्रम यशस्वी झाला. कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. आर बी जोग व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.
चारित्र्य व नेतृत्व गुण विकास म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना
|