बातम्या

हातकणंगले मतदारसंघात विकासकामे करणार - लक्ष्मण तांदळे

Development works will be done in Hatkanangle Constituency  Laxman Tandale


By nisha patil - 2/25/2024 10:10:09 PM
Share This News:



हातकणंगले मतदारसंघात विकासकामे करणार - लक्ष्मण तांदळे

लोकसभा हातकणंगलेचे ईच्छुक लक्ष्मण तांदळे यांनी शाहुवाडी दौरा केला

शाहुवाडी  :प्रतिनिधी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे निवडे ता.पन्हाळा येथील लक्ष्मण शिवाजी तांदळे यांनी गेल्या काही दिवसांपासून शाहुवाडी विधानसभा मतदारसंघात मतदारांशी थेट भेटीघाटी घेऊन दौरा यशस्वी केला.

 अठरा वर्ष सामाजिक कार्यात सहभागी असणारे युवा लहुजी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण तांदळे यांनी यावेळी निवडणूक लढविण्यासाठी मतदारसंघात चाचपणी केली होती. चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांनी कोणत्याही पक्षातून निवडणूक लढवली जाणार असल्याचे सांगितले होते. लवकरच ते कोणत्या  पक्षातून निवडणूक लढवायची  हे कळविण्यात येईल.

विद्यमान खासदार यांनी गेल्या पाच वर्षात जनतेच्या समस्या सोडविल्या नाहीत. ते कुठे आहेत? असे म्हण्याची वेळ आली आहे. तर् दुसरे माजी. खासदार फक्त ऊसाला दर मागुन गप्प असतात. या दोघांना मतदारांनी झिडकारले आहे. म्हणून मी सध्या हातकणंगलेतून निवडणूक लढवत आहे.  तांदळे यांनी युवा लहुजी संघर्ष सेनेच्या वतीने दिल्ली, मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी सतरा वर्ष आंदोलन केली. आरक्षण भूमीहिनांना न्याय मिळावा, वंचितांना न्याय मिळावा, लहुजीन वस्ताद साळवे आयोग लागू करावा त्यांचे स्मारक व्हावे आदी मागणीसाठी आंदोलन केलीत. सध्या त्यांनी या लोकसभा मतदारसंघावर लक्ष दिले
असून शाहूवाडी तालुक्यात सुद्धा दबदबा निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे. 

निवडे तालुका पन्हाळा येथे वीस वर्षापेक्षा अधिक वेळ त्यांच्या कुटुंबियांनी गावाचे नेतृत्व केले आहे. पंचायत समिती निवडणूक सुद्धा लढवली होती. आता त्यांनी लोकसभा मतदारसंघ टार्गेट केले आहे. गावाच्या समस्यासह तालुक्यातील व लोकसभा मतदारसंघातील सुद्धा विविध समस्येवर आंदोलन करणार असल्याचे तांदळे यांनी सांगितले. तांदळे परिवार प्रत्येक ठिकाणी समाजातील गरीब, गरजु जनतेच्या मदतीसाठी कायम पुढे आहे. मतदारसंघात दौरा केला असता मतदारांनी निवडणूक लढवण्याची हीच वेळ आहे. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हातकणंगले मतदारसंघ आरक्षित असल्या कारणाने या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रचंड मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांना नोकरी नाही, यामुळे बेरोजगारी वाढली आहे. उच्चशिक्षित तरुण नोकरी नसल्यामुळे व्यसनाधीन होत आहेत. आरोग्य समश्या, ऊस दरवाढ, रस्ते, पाणी आदी समस्या सोडवण्यासाठी व विद्यमान खासदार मतदारसंघात सोधण्याची वेळ आली आहे. यामुळे आपण जनतेच्या विकासासाठी मैदानात उतरणार असल्याचे  तारा न्युज प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.


हातकणंगले मतदारसंघात विकासकामे करणार - लक्ष्मण तांदळे