बातम्या

तारदाळ येथे एक कोटी 61 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ...

Development works worth Rs 1 crore 61 lakh started at Tardal


By nisha patil - 10/10/2024 3:09:08 PM
Share This News:



तारदाळ येथे एक कोटी 61 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ...

डॉक्टर राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झाला निधी..

लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे आमदार फंडातून मंजूर झालेल्या १ कोटी ६१ लाख रुपये निधीतून तारदाळ येथील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच जी. के. नगर सांस्कृतिक भवनाच्या स्लॅबच्या कामाचा शुभारंभ सौ. मोश्मी आवाडे वहिनी यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमानिमित्ताने शारदीय नवरात्र उत्सवाच्या दरम्यान दुर्गामाता देवीचे दर्शन घेण्यात आले.

कार्यक्रमाला तारदाळचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी तसेच भागातील नागरिक आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


तारदाळ येथे एक कोटी 61 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ...